पसायदान

>> 2/2/15

ज्ञान सेतू साठी महाराष्ट्रा बाहेरून आलेल्या पाहुण्यांना आम्ही ही फ्रेम भेट म्हणून दिलि.
मराठी calligraphy मध्ये पसायदान आणि त्याचा इंग्लिश मध्ये अर्थ. .

Read more...

ज्ञान-सेतू मेळावा

>> 1/17/15


Read more...

ज्ञान सेतू - एक अभिनव उपक्रम. . !

>> 1/1/15

२०१२ सालच्या मार्च महिन्या मध्ये मी व आमचे काही सहकारी नागालॅंड ला विज्ञान शिबीर घेण्यासाठी गेलो होतो. त्याचा वृतांत मी मागच्या नागालँड चे मित्र बनूया... या पोस्ट मध्ये सविस्तर पणे दिलाच आहे.

त्याच उपक्रमाचे आता मोठ्या स्वरुपात रुपांतर करून एक मोठी चळवळ उभी करण्याचे प्रयत्न आम्ही करत आहोत.

ज्ञान प्रबोधिनी च्या EARC ( Educational Activity Research Center ) अंतर्गत भारताच्या दुर्गम आणि कमी विकसित राज्यांमधील विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक विकासासाठी " ज्ञान सेतू " हा स्वयंसेवी उपक्रम हातात घेतला आहे. सध्या असोम , अरुणाचल प्रदेश , मेघालय , सिक्कीम , छत्तीसगड , ओदिषा , झारखंड , जम्मू - काश्मीर आणि  नागालँड या राज्यांमध्ये ज्ञान सेतू चे स्वयंसेवक काम करत आहेत.

सर्वसाधारण tourist म्हणून फिरायला जाणं आणि ज्ञान सेतू च्या उपक्रमातून तिथल्या शाळेत जाणं , तिथल्या स्थानिक लोकांत मिसळून त्यांच्याशी गप्पा मारणं , science -workshops घेणं यात जमीन अस्मानाचा फरक असतो . खूप चांगल्या प्रकारे आपण तो प्रदेश जवळून पाहू आणि अनुभवू शकतो. साधारणतः ६ ते १५ दिवसांसाठी स्वयंसेवक science -workshops घेयासाठी वेगवेगळ्या प्रदेशात जातात. जाण्या अगोदर workshops चे प्रशिक्षण इथेच दिले जाते. हा खालचा विडिओ बघून आपल्याला उपक्रमाची कल्पना येईल . . .

प्रत्येक प्रदेशां मध्ये तिथल्या स्थानिक स्वयाव्सेवक संस्था आपल्या बरोबर काम करत आहेत. बचपन बनाव , विवेकानंद केद्र , राष्ट्रीय सेवा भारती , Research Institute of World’s Ancient Traditions Cultures & Heritage अशा संस्थांचे फार मोठे काम या राज्यांमध्ये चालते. 
याच उपक्रमाचा एक भाग म्हणून येत्या २६ जानेवारी २०१५ ला ज्ञान सेतू मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. जाउन आलेले स्वयंसेवक , जाण्यास इच्छुक असलेले स्वयंसेवक , मार्गदर्शक  आणि स्थानिक सस्थांचे प्रतिनिधी अशांचा मोठा मेळावा ज्ञान प्रबोधिनी मध्ये होणार आहे.

अधिक माहिती साठी ज्ञान सेतू च्या website ला आपण भेट देऊ शकता . . . 

https://gyansetu-earc.in/


फेसबुक पेज : 

https://www.facebook.com/pages/Gyan-Setu/365034473625851 

ज्ञान सेतू च्या माध्यमातून दुर्गम राज्यांमध्याला मित्रांशी मैत्रीचे सेतू तयार करण्या साठी आपणही या उपक्रामात सहभागी होऊ शकता. 

अधिक माहितीसाठी काळ -वेळाचे भान न ठेवता मला फोन अथवा E-mail करू शकता . . 

ॐकार देशमुख 
मो.नो.  : ९८२२५२५६६२
E-mail - deshmukhomkar@gmail.com 


Read more...

पुनरुत्थान समरसता गुरुकुलम - चिंचवड

>> 12/29/14

                                                            गिरीश प्रभुणे नी चालू केलेल्या "पुनरुत्थान समरसता गुरुकुलम" मध्ये काम करण्याची मला संधी मिळाली हे मी माझं भाग्यच समजतो. 

चिंचवड गावातली गुरुकुल ची वस्ती शाळा एकदा तरी भेट देऊन बघण्या सारखी आहे आणि सोबत गिरीशजी असतील तर आपण भारावून गेल्याशिवाय राहणार नाही. 
गुरुकुल मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यासाठी एक छोटेखानी प्रयोग शाळा असावी असा विचार गिरीशजी च्या मनात होता . पारंपारिक ज्ञानाला विज्ञानाची जोड देऊन मुलांनी शिकावं हे ह्या मागचं उद्दिष्ट . . प्रदीर्घ चर्चा आणि बैठकां नंतर इन्फोसिस च्या 'स्पर्श' गटाने आर्थिक मदत देण्याची तयारी दाखवली .

 

काम सुरु होण्या आधीचा हा फोटो . शाळेतल्याच एका वर्गाची प्रयोग शाळा करायचे होती. 
 Architecture आणि Construction ची जबाबदारी मी साभाळली . 
अडगळी च्या खोली प्रमाणे असलेल्या या जागेत बरेच बदल करावे लागणार होते . नवीन भिंती ,खिडक्या , प्रयोग शाळेचं समान. . . अणि हे सर्व २० दिवस आणि कमी खर्चात . !
 इन्फोसिस चे कार्यकर्ते , कंत्राटदार आणि आम्ही सर्वांनी ठरलेल्या वेळेत प्रयोग शाळा चालू करण्यासाठी जोरात कामाला सुरुवात केली. . . असंख्य अडचणी , on-site problems , चर्चा या नंतर २० दिवसांनी प्रयोग शाळा पूर्ण झाली. लगेचच दीपोत्सव साजरा करून प्रयोग शाळेचं उद्घाटन झालं . 
पूर्ण झाल्या नंतर चे काही फोटोस . 

गुरुकुल सारख्या शाळेत  गिरीशजी बरोबर काम करण्याचा आनंद आणि समाधान काही वेगळच … !

 
 गुरुकुल चे facebook page.
Read more...

नागालैंड चे मित्र !!!!!

>> 8/14/12

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो ,
मागील १० तारखेच्या ब्लॉग पोस्ट मध्ये मी नागलंड च्या  शाळांमधील उपक्रमासाठी आव्हाहन केले होते.
त्यानुसार आत्तापर्यंत रू,१५००० जमा झाले असून अजून साधारणत: १५ ते १७ हजार रुपयांची आवश्यकता आहे , जेणेकरून  i3 processor असलेला Laptop आपण  विकत घेऊ शकतो..
या आठवड्यात निधी जमा झाल्यास लगेचच Laptop विकत घेऊन तो तिकडे पाठविण्याचा मानस आहे..
तरी ज्यांची इच्छा आहे अशांनी लवकरात लवकर आपली मदत पोहोचवावी..
माझा भ्रमणध्वनी क्र : ९८२२५२५६६२
अथवा मला E-mail करा @ deshmukhomkar@gmail.com 

Read more...
Related Posts with Thumbnails
eXTReMe Tracker

  © Blogger template Inspiration by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP