-

3 BHK इंटिरियर डिझाईन @ कोथरूड , पुणे .

>> Thursday, January 24, 2019

जून महिन्यामध्ये संतोष चा मला फोन आला कि दीड दोन महिन्यात त्याला त्याच्या नवीन फ्लॅट चे पझेशन मिळणार आहे. तर त्याचे इंटिरियर डिझाईन करायचे आहे . कोथरूड मध्ये गोखले construction च्या नवीन इमारती मध्ये त्याचा ३ BHK प्रशस्त फ्लॅट आहे. ११०० sq.ft. कार्पेट एरिया असलेल्या फ्लॅट चे काम साधारण १ ते दीड महिन्यात पूर्ण करायचे होते , कारण तेवढ्याच वेळासाठी तो US वरून पुण्यात येणार होता. १० ते १२ लाख पर्यतच बजेट आहे, अस त्यानी  मला आधीच सांगितलं होत .


काम सुरु होण्या आधीचे फोटो



सुरवात आम्ही लेआऊट पासून केली , २D प्लॅन वर त्याच्या बरोबर चर्चा करून , त्याच्या गरज लक्षात घेऊन एक फर्निचर चा आराखडा तयार केला. लिविंग रूम मध्ये सीटिंग , TV युनिट , शु रॅक , मोडयुलर किचन , बेड लोकेशन , वॉर्डरोब लोकेशन , स्टडी युनिट्स याचे लोकेशन आणि त्याचा साधारण आकार याचा त्याला अंदाज घेतला . बजेट नुसार आणि जागेच्या उपलब्धतेनुसार प्लॅन मध्ये योग्य तो बदल करून लेआऊट फायनल केला. 
फायनल झालेल्या लेआऊट नुसार मी रफ एस्टीमेट काढून त्याच्याकडून approval घेतल. २D लेआऊट वरून , आपल फर्निचर कस दिसेल ह्याचा त्याला काहीच अंदाज येत नव्हता ,  पण conceptual ३D views बनवून दिल्यामुळे त्याच्या मनातल्या बऱ्याच शंका दूर  झाल्या आणि डिझाईन समजायला हि मदत झाली . 





                                           Conceptual ३D Views 

इंटिरियर कामाची सुरुवात सिविल चेंजेस पासून सुरु होते , पण इथे तोडफोड नसल्यामुळे आणि नवीनच फ्लॅट असल्यामुळे डायरेक्ट  False Ceiling आणि  इलेक्ट्रिकल वायरिंग  , पॉईंट शिफ्टिंग ला सुरुवात केली.  बदललेल्या फर्निचर लेआऊट नुसार नवीन इलेक्ट्रिकल पॉईंट्स घेतले , AC पॉईंट्स , इन्व्हर्टर वायरिंग ची सुद्धा सोया करून घेतली.  लिविंग रूम आणि डिनिंग मध्ये false सिलिंग चे काम सुरु असतानाच बेडरूम्स मध्ये बेड आणि वॉर्डरोब चे काम सुरु केले. मोडयुलर किचन चे डिझाईन फायनल करून त्याची ऑर्डर दिली , कारण ते फॅक्टरी मेड असते , आणि तयार होऊन येण्यासाठी १५ ते २० दिवस लागतात . मॉड्युलर किचन मध्ये बजेट नुसार बरेच वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत , इथे आम्ही प्लायवुड + ३MM Polyacylic शटर निवडले, जे कि मेंटेनन्स लाही सोपे असतात आणि दिसायलाही प्रीमियम वाटतात. लेटेस्ट क्रोम फिनिश हॅन्डल्स लावल्यामुळे किचन ला एक हायफाय लुक आला.कांदे आणि बटाटे ठेवण्यासाठी विकर बास्केट सुद्धा बसबुन घेतली. 
१४ फूट  Polyacrylic  शटर्स विथ सॉफ्ट क्लोजिंग चॅनेल , SS वॉशेबल ट्रॉलीज , ओव्हरहेड युनिट विथ फ्रॉस्टेड ग्लास ह्या सगळ्याचा खर्च साधारण १.५० लाख आला. 


बेडरूम्स मध्ये प्लायवुड + लॅमिनेट ची निवड केली  ,  त्यामध्ये Rs. ८० चे प्लायवुड आणि rs. १८०० पर्यतचे लॅमिनेट घेतले.पेरेंट्स  च्या रूम मध्ये वूड फिनिश लॅमिनेट  , मास्टर बेडरूम मध्ये डार्क वॉलनट सिलेक्ट केला. 
भरपूर नॅचरल light आणि मोठ्या रूम्स असल्यामुळे इथेडार्क कलर चे लॅमिनेट वापरता आले. सलिडिंग वॉर्डरोब घेतल्यामुळे जागेची बचत झाली. वॉर्डरोब च्या वरचीही जागा कव्हर करून घेतली , त्यामुळे एक्सट्रा स्टोरेज स्पेस मिळाली. बेड च्या खाली देखील sliding स्टोरेज करून उश्या , पांघरूण ठेवण्यासाठी जागा तयार केली . 
तीनही बेडरूम्स मध्ये False Ceiling करून LED Downlighters वापरले . false सिलिंग करून , lighting केल्याशिवाय घरात इंटिरियर केल्याचा "फील"येत नाही. भिंतीचा रंग पांढरा ठेवल्यामुळे घराला एक contemporary लुक आला आणि त्यामुळे त्यावर फर्निचर उठून दिसते.   



  पूर्ण झाल्यानंतर पेरेंट्स बेडरूम.. 

डार्क ग्रे / light कॉम्बिनेशन मधली मास्टर बेडरूम 

                               
                  मास्टर बेड मधील  वॉर्डरोब आणि स्टडी युनिट 
किड्स बेडरूम 

किड्स बेडरूम मध्ये विचारपूर्वक व्हाईट ग्लॉसी  लॅमिनेट निवडले आणि त्यावर विनील स्टिकर्स नि डिझाईन तयार केले. जेणेकरून मुलांना त्यांच्या आवडीप्रमाणे स्टिकर्स लावता येतील आणि काढता येतील . मुलांचे वय वाढेल , त्याच्या आवडीनिवडी बदलतील त्याप्रमाणे रूम मधले स्टिकर्स आणि अँबियन्स बदलत राहतील , तेही कमी खर्चात.. 



पूर्ण झाल्या नंतर लिविंग रूम आणि किचन . 

L - shape सीटिंग खालीही एक्सट्रा स्टोरेज ची जागा केलेली आहे. .  लिविंग रूम मधले सेन्टर टेबल  , नवीन कॉन्व्हर्टिबल फिटटींग लावल्यामुळे  स्टडी किंवा डाईनिंग टेबल  म्हणून सुध्या वापरू शकतो आणि त्यामध्ये पेपर रद्दी ठेवण्यासाठी जागा मिळते.  
वॉल माउंटेड डाईनिंग टेबल घेतल्यामुळे येण्याजाण्यात अडचण होत नाही. 

मटेरियल साईट वर येण्यापासून शेवटच्या साफसफाई पर्यंत साधारण ३५ दिवसां मध्ये आम्ही काम पूर्ण केले. दिलेल्या बजेट आणि  वेळेमध्ये काम पूर्ण केल्याचे समाधान काही वेगळेच असते. 
शेवटी काय .." A satisfied Costumer is the best best business strategy of all..! " 

ह्या प्रोजेक्ट चा आम्ही एक वॉक थ्रू  बनवलं आहे. त्यामध्ये संपूर्ण घर तुम्ही फिरून पाहू शकता . 
खालच्या लिंक वरून तुम्ही तो बघू शकता.



तुमच्या घरचेही इंटिरियर डिझाईन करायचे असेल किंवा काही शंका असतील तर मला विनासंकोच विचारा .. !!
माझा मेल id - deshmukhomkar@gmail.com


Read more...

संक्रांत

आंतले जे अवगुण 
क्रांत होता सद्गुण 
उत्क्रांत वर्तन, मति,मन 
संक्रांत तव सत्संक्रमण ॥

-- शैलजा रमेश किंकर, पुणे.

Read more...
Related Posts with Thumbnails

Total Pageviews

Follow me on Blogarama
Netbhet.com  मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!
marathisuchi - free marathi link sharing website & marathi blogs aggregator
Blogvani.com
eXTReMe Tracker

  © Blogger template Inspiration by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP