-

आमचा #Homemade #Eco Friendly Bappa

>> Saturday, August 26, 2017

गेली सहा वर्ष आमचे father घरीच बाप्पाची शाडूची मूर्ती तयार करतात..आधीच आपला लाडका गणपती बाप्पा आणि त्यात घरीच तयार होत गेलेली मूर्ती , त्यामुळे त्याबद्दल एक वेगळीच आपुलकी निर्माण  होते..
गणेश चतुर्थीच्या आधी साधारण १५ -२० दिवस मूर्ती बनवायची लगबग चालू होते. मूती च design , मागची सजावट काय करायची ह्यावर घरात भरपूर चर्चा चर्वण होतं. बोहरी आळी मध्ये जाऊन शाडूची माती आणायची  , venus  मधून माती कामाचा सामान , रंग रंगोटीचं साहित्य , रिबीन्स  , चमक्या ,  टिकल्या , मूर्ती कारखान्यातून आणलेला स्किन कलर  असं करत करत गेल्या सहा वर्षात आमच्या कडे मूर्ती  कलेचं बऱ्यापैकी सामान जमा झालंय.. माझ्याकडे फक्त डोळे , सोंडेवरची नक्षी आणि उंदीर मामा करण्याची जबाबदारी असते..
बोहरी आळी मध्ये साधारण ८० रु.. किलो प्रमाणे शाडूची माती मिळते. ६ ते ७ इंचाचा भरीव बाप्पा करण्यासाठी १ ते २ किलो माती लागते. शाडूच्या मातीमध्ये अशुद्धीचे प्रमाण आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता मध्यम असते.
शाडूची माती लगेच भिजत नाही. मूर्ती तयार करायच्या आधी ३ ते ४ दिवस माती भिजवून ठेवावी लागते. 
माती चांगली भिजल्यानंतर ते व्यवस्थित कालवून घेतात .. 

यंदा आम्ही बालक गणेश मूर्ती करायचा ठरवलं होतं.  भरीव शाडूच्या मातीची मूर्ती खूप जड होते , so  ह्या वेळीं father नि aluminium foil चा गोळा करून त्यावर शाडूची माती लिंपून घेतली .  त्यामुळे वजन बऱ्या पैकी कमी झालं आणि मूर्ती लवकर वाळली . 

दोन दिवस काम केल्यानंतर ची मूर्ती 

थोडं फिनिशिंग अँड detailing .. 
वॉटर कलर चा पहिला हात दिल्यानंतर .. 

पूर्ण झालेली बापाची मूर्ती .  पितांबर आणि लाल शेला ..!

यंदा आम्ही पेपर फोल्डिंग चा decoration  केलंय .. 
प्राण प्रतिष्ठा केल्यानंतर आमचा बाप्पा 


गेल्या वर्षी ( २०१६ ) अस्मि चा शाळेचं पहिला वर्ष होतं.. सो आम्ही शाळेचा देखावा केला होता . शाळा आणि विद्यार्थी गणपती . 
२०१५ साली केलेला फेटाधारी गणपती बाप्पा .. 
अस्मिच्या खेळण्यांमध्ये रमलेला २०१४ सालचा गणपती बाप्पा..!
अस्मि चा जन्म २०१३ सालचा ..so त्या वेळचा कमळामध्ये विराजमान झालेले शिशु गणेश .. 
२०१२ सालचे शाही  गणेश .. 

घरी केलेली २०११ सालची पहिली पहिली गणेश मूर्ती . 

मूर्तीच विसर्जन आम्ही गच्ची वर काकांनी तयार केलेल्या बागेत बादलीमध्ये नाहीतर नदीवर मनपाच्या हौदात करतो. 

बाहेरच्या POP च्या मूर्ती सुबक आणि चमकणाऱ्या  असल्या तरी ,  ओबड धोबड असलेला आणि घरी जन्माला आलेला शाडुच्या मातीचा बापा खूपच आपलासा वाटतो .. 
तर तुम्हीपण पुढच्यावर्षी try करून बघा ..काही अडलं तर विचारा मला मी आहेच सांगायला .. 













Read more...

पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स ची बेईमानी

>> Monday, May 8, 2017



वजनातली घट 

एक जुनं पैंजण बदलून एक नवी वस्तू घ्याची होती, पैंजण काऊंटर वरच्या मुलीला दिलं . हे आमच्या कडून घेतलेला नाही , सो ह्यावर आम्ही घाट धरणार . मी म्हणालो ठीके..
तिकडून एक माध्यम वयीन माणूस आला , लांबूनच पैंजण बघून , २५% घट धारा असा म्हणून निघून गेला.. मी तर चाटच पडलो ..! २५ % ??!! R u joking ??  २५ % घट  असा लांबून बघून कळते का?? ह्याला काही measurements / standards  आहेत का नाही ? २५% खूपच झाले ना??  एखादा दागिना त्यांच्या कडून घेतला नाही तर त्यात घट होते ..आणि घेतला तर घट होत नाही असा कसा शक्य आहे ??  ही शुद्ध फसवणूक आहे..!!
२ ते ४ टक्के , वापरानुसार आपण समजू शकतो , पण २५% .. too much..!

कार्ड पेयमेन्ट 

सोनं  खरेदी मी टाळतोच , त्यापेक्षा mutual fund मध्ये पैसे टाकलेले बरे , पण काही कारणामुळे वळ घ्यायसाठी पु. ना. गाडगीळ सराफांकडे गेलो होतो  . पेयमेन्ट करताना कॅश काऊंटर वरचा माणूस मला म्हणाला कि कार्ड पेयमेन्ट असेल तर २% एक्सट्रा द्यावे लागतील .. २% एक्सट्रा ऐकून मला आश्चर्य वाटलं.. मी त्याला विचारला तर तो म्हणाला कि this  is our policy ..! आमच्यात थोडा वाद झाला , पण तो तर साधा एम्प्लॉयी ,  त्याच्या हातात काय असा विचार करून मी राग आवरला.. 

पण परत PNG कडे यायचा नाही असा निर्णय पक्का झाला.. 


आपल्यापैकी बऱ्याच जणांना  असा अनुभव आला असेल  . वस्तुतः , कार्ड पेयमेन्ट प्रोसेस करण्यासाठी बँक दुकानदाराकडून काही प्रमाणात शुल्क आकारते.  हे शुल्क भरणं ही दुकानदाराचीच जबाबदारी असते. परंतु पु. ना. गाडगीळ ही जबाबदारी ग्राहकाकडून वसूल करून घेतेय.  RBI ची नेटीस खाली दिलेली आहे , पॉईंट नो. ४ मध्ये त्यांनी स्पष्टपणे  लिहिलंय की ही दुकानदाराचीच जबाबदारी आहे. 


आपण काय करू शकतो ?

पुढच्या वेळी आपल्याकडून असे एक्सट्रा चार्जेस कोणी मागत असेल , तर आपण RBI च हे notification  त्याला दाखवू शकतो.  किंवा प्रत्येक बँकेच्या website वर  , मर्चंट्स सेकशन मध्ये कम्प्लेंट बॉक्स असतो. त्यावर कम्प्लेंट टाकू शकतो. मी already कम्प्लेंट  टाकलेली आहे.

घट धरण्याचे काही नियम असतात का ? त्याला काही measurements / standards  आहेत का ? ह्याचा मी शोध घेत आहे  , तुम्हाला काही माहित असेल तर जरून share करा..!

अर्थातच , एकट्या -दुकट्याने कंप्लेंट टाकून पु. ना. गाडगीळ ला काहीच फरक पडणार नाही , सगळ्या पुणेकरांनी ठरवलं तरच आपली फसवणूक थांबू शकते.


Read more...

नवीन फ्लॅट बुक करताना - #१

>> Wednesday, March 1, 2017

नमस्कार मित्रहो ,

नवीन DP - जुना DP , मोदींच निश्चलनीकरण , संथ बाजार या मुळे  नवीन घर अथवा फ्लॅट घेणारे जरा संभ्रमात आहेत ..so as an architect म्हणून माझ्या कडून थोडी माहिती सांगतोय..

कुठे फ्लॅट घ्यावा , कुठला बिल्डर चांगला , एरिया कुठला चांगला , रेट किती , रेरा चा काय करायचं ह्याची माहिती तुम्ही रवी करंदीकरांच्या ब्लॉग वर वाचू शकता.. 😜

मी फक्त architectural view सांगणार आहे..

बरं..

सर्वात प्रथम किती आकाराचं फ्लॅट घ्यावा ..सध्या पुण्यात 1BHK, 1.5 BHK ,2 BHK 2.5 BHK ,3BHK ,4BHK , 5BHK , ५०० sq.ft.  तो ५००० sq.ft  चे फ्लॅट्स मिळतात . सर्व व्यवहार हा सेलेबल  एरिया वर चालतो.  साधारणतः  architect  लोक , सेलेबल डोक्यात ठेवूनच design  करतात ..कारण सध्या च्या मार्केट मध्ये ticket size ला जास्त महत्व आला आहे .. म्हणजे २५ लाखात १ bhk  , ४५ लाखात २ bhk , वगरे .. so , फ्लॅट डडिसाईन सुद्धा ही अंतिम किंमत डोक्यात ठेऊनच केला जातो .

समाज १० फूट X १० फूट ची रूम असेल तर..
कार्पेट एरिया झाला १०० sq.ft.
बिल्ट उप एरिया म्हणजे कार्पेट एरिया अधिक बाजूच्या भिंती , so ६ इंच जाडीच्या भिंती पकडल्या तर , बिल्टउप एरिया झाला १२१ sq.ft.  .
तर सेलेबल एरिया हा बिल्डर ठरवतो , सध्या पुण्यात ३५% सेलेबल कार्पेट वर add करतात ..
सो आपला सेलेबल एरिया झाला १३५ sq.ft.

हा सेलेबल एरिया आला कुठून?

तर तुमच्या फ्लॅट चा कार्पेट एरिया अधिक बाहेरील पॅसेज  , लिफ्ट , जिना , कॉमन  एरिया  , क्लब हाऊस ह्या सर्वांचं वाढीव एरिया बिल्डर सर्व फ्लॅट्स मध्ये विभागतो आणि जो येतो तो % , सेलेबल..

पुण्यामध्ये साधारण ३५ टक्के एरिया कार्पेट मध्ये वाढवून सेलेबल काढला जातो.. पण तो ३५% असतोच असा नाही..कमीही असून शकतो.. commercial शॉप्स , ऑफिसेस साठी साधारण ४५ ते ५० टक्के लोडींग धरल जातं .  मुंबई मधेही residential फ्लॅट्स ना ४५% लोडींग असत..

या प्लॅन मधून सेलेबल , कार्पेट आणि बिल्ट उप मधला फरक लक्षात येईल.


FSI calculations हे बिल्ट उप एरिया वर केले जातात. बिल्ट उप एरिया च्या १५% बाल्कनी आपण वाढीव वापरू शकतो. अर्थातच काही प्रीमियम भरून . २०% पर्यंत टेरेस फ्री मिळते. आत्ताच्या नवीन DP नुसार १५% बाल्कनी जी पूर्वे रूम मध्ये जोडून घ्यायची परवानगी होती , ( enclosed बाल्कनी) ती आता पुन्हा काढून टाकण्यात आली आहे .
ह्या वर construction लॉबी मध्ये भरपूर चर्चा चालू आहे...काही महिन्यात त्यावर पुनर्विचार होईलच .
नवीन रेरा नियमतानुसार याला पुढील सर्व व्यवहार हे कार्पेट एरिया वर करण्याचे निर्देश आहेत , त्या मुले पुढील व्यवहार हे कार्पेट एरिया आणि square मीटर मध्ये करावे लागणार आहेत.

so  , फ्लॅट बुक करताना नेहमी योग्य size असलेला terrace, बघूनच फ्लॅट बुक करावा .  १ bhk ला खूप मोठी terrace , अथवा २ bhk  ला २ टेरेसेस असतील तर आपण वापरत असलेला कार्पेट आणि विकत घेताना मध्ये आलेला सेलेबल एरिया ह्यात तफावत निर्माण होऊन आपलेच नुकसान होईल. साधारण ८ फूट X ८ फूट आकाराची terrace २ BHK साठी आदर्श आहे. ड्राय बालकनी साधारण ५ फूट X  ८ फूट असल्यास त्या मध्ये वॉशिंग मशीन , युटिलिटी आणि कपडे वाळत घालण्यासाठी पुरेशी जागा मिळते.  त्याहून लहान बाल्कनी असेल तर मग वॉशिंग मशीन साठी दुसरी जागा शोधावी लागेल .  पॅरलल किचन असेल तर ८ फूट लांबीचा किचन ओटा पुरेसा आहे. सध्या ओपन किचन चा ट्रेंड आहे , ज्यात ब्रेकफास्ट काउंटर जोडलेला असतो. फ्लॅट बघताना बेडरूम मध्ये बेड पोसिशन , वॉर्डरोब , ड्रेसिंग , स्टडी ची जागा पुरेशी आहे ना ह्याची खात्री करून घ्यावी.  १ BHK  फ्लॅट मध्ये बाथ आणि  WC वेगळ असलेला सोयीस्कर असत  . २ BHK  मध्ये १ attached आणि १ कॉमन आपण वापरू शकतो.  लिविंग रूम ला जरा एक छोटी एंट्रन्स लॉबी असेल तर त्याचा उपयोग चप्पल स्टॅन्ड , सीटिंग साठी करता येतो आणि बाहेरील व्यक्ती अचानक समोर येत नाही , साधारण ४' X ५' चे छोटी लॉबी असणं कधीही चांगलं.

सध्या , घर , फ्लॅट , प्लॉट , घेताना वास्तुशास्त्र बद्दल नक्की विचार करतात , this thing is being very personal , मी त्यावर काही कंमेंट करणार नाही.  ह्या पोस्ट वर तुम्हाला काही शंका असतील तर नक्की कंमेंट करा . पुढच्या पोस्ट मध्ये कुठल्या मजल्या  वरचा , कोणत्या दिशेचा फ्लॅट असावा ह्या बद्दल थोडी माहिती टाकेन..

भेटूच..   







Read more...

आश्रम

>> Sunday, February 12, 2017


आश्रम 



थकलेल्या श्वासांचा गाव 
काका , मामा , आजी , मावशी 
हाकेपुरते नुसते नाव.. 
थकलेल्या श्वासांचा गाव  ।।

नावानिशी ओळख ना उरली ,
पत-प्रतिष्ठा वाया ठरली 
मुले विसरली अस्तित्व 
थकलेल्या श्वासांचा गाव  ।।

डोळयांमधली आस संपली 
रागाची ठिणगीही विझली 
उरला ना कुठलाही भाव 
थकलेल्या श्वासांचा गाव  ।।

गात्रे हतबल झिजलेली 
काया व्याधींनी क्षीणली 
भय मृत्यूचे घेते ठाव 
थकलेल्या श्वासांचा गाव  ।।

कुणा वाटते स्वरात भिजवू 
कुणी वाचनी बघते रिझवू 
नुसते मलम ना मिटती घाव 
थकलेल्या श्वासांचा गाव  ।।

आश्रम हा परिसर झकास 
अंत:करण तरीही भकास 
ओठी जरी देवाचं नाव 
थकलेल्या श्वासांचा गाव  ।।

सदर कविता माझी आत्या शैलजा रमेश किंकर हिने अखिल भारतीय साहित्य संमेलन , डोंबिवली येथे ५ फेब्रुवारी २०१७ रोजी सादर केलेली आहे. 

Read more...
Related Posts with Thumbnails

Total Pageviews

Follow me on Blogarama
Netbhet.com  मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!
marathisuchi - free marathi link sharing website & marathi blogs aggregator
Blogvani.com
eXTReMe Tracker

  © Blogger template Inspiration by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP