कर्माचा सिद्धांत..!

>> Monday, May 4, 2015

खर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र ……असा मोठ्ठा आवाज आला , आणि पूर्ण ST बस दरीच्या बाजूला कलली . . !
एक क्षण थांबली …
आणि धाड धाड आवाज करत १०० फूट दरीत कोसळली.
मी समोरच्या बार ला घट्ट धरून बसलो होतो. . पूर्ण बस मध्ये नुसता आरडा ओरडा चालू होता .. लहान मुलं बायकांचे रडण्याचे आवाज . . १,२,३,४ कोलांट्या उड्या मारत गाडी खाली चालली होती. . माणसांसकट समान इकडे तिकडे पडत होतं . . सगळ काही गोल गोल फिरत होतं. . चार पलट्यांनंतर आडवी होऊन गाडी थांबली . . तरी जरा हालातच होती . जिवंत आहोत याचा आनंद झाला .!
शेजारी पलाश नव्हता त्यामुळे जरा टेन्शन आला होत..दांडेकर काका पण दिसत नव्हते. . गाडी ज्यावेळी थांबली तेव्हा मी सीट वर उभा होतो..
वरच्या खिडक्या कधीच तुटून पडल्या होत्या , खाली एक बाई पडली होती ..
खूप oil , सामान , समोरच्या सीट वरची फुटलेली अंडी , भाजीपाला , धूळ , माती आणि रक्त..
मी वरच्या तुटक्या खिडकीतून बाहेर उडी मारली , पलाशला बाहेर बघून एकदम जीवात जीव आला. माझ्या तोंडातून रक्त येत होतं ,पलाश ला पण हाता पायाला लागलं होतं .
बाहेर आलो तरी गाडी हालातच होती .. लोकं जशी बाहेर पडत होती तसा तिचा balance जात होता. . आम्ही ३ ४ जणांनी एका बाजूनी गाडीला धरून ठेवलं होतं पण एका माणसानी बाहेर उडी मारली तसा तीचा balance गेला आणि अजून एक पलटी घेत गाडी खाली जाऊन झाडात अडकली . . !आम्ही ८ - १० जणांना बाहेर काढलं. . एक पाच महिन्याचं बाळ . . ७५ वर्षाची म्हातारी ..दांडेकर काकाही बाहेर पडले . . driver नखशिखांत oil नी माखला होता..
नशीबानं कोणीही दगावलं नाही पण बरेचजण जबर जखमी होते. . .
सगळीकडे काचा , oil , रक्त आणि विव्हळणारि लोकं . . एकुणंच खूप भयंकर दृश्य होतं. .
एव्हाना वरती बरीच गर्दी जमली होती . . कहिजण मदतीसाठी खाली उतरले होते. काही जणांना वर नेलं होतं. .
इतक्या गोंधळातही एक बाई तिच्या डोक्याचा रुमाल शोधत होती. . बरेच मोबाईल हरवले होते.
गोंधळ थोडा शांत झाल्यावर आणि सगळी लोकं बाहेर आलीयेत असं बघितल्यावर आम्हीही आमच्या सामानाची जुळवाजुळव केली . . काकांचा मोबाइल सोडुन सर्व काही मिळालं. .
सगळं सामान घेऊन मी न पलाश दरी चढून वर आलो . . काकांनाही दोरीला धरून वर काढलं . .

'मैत्री' अथवा 'मेळघाट मित्र' ही संस्था मेळघाट मध्ये गेली १७ १८ वर्ष बालमृत्यू , कुपोषण  आणि अशा अनेक उपक्रमांवर उत्तम काम करत आहे . त्यातल्याच एका 'मैत्री घरकुल ' योजनेचा भाग म्हणून २३ एप्रिल २०१५ ला  मी , वर्गमित्र पलाश आणि दांडेकर काका ( वय ६६ ) मेळघाट ला जाण्यासाठी पुण्याहून निघालो.  सरकार तर्फे मिळणार्या अनुदानातून पारंपारिक वारसा न विसरता घर बांधण्यास मदत करण्यासाठी चिलाटी नावाच्या गावात आम्ही निघालो होतो.
मेळघाट मधेही concrete jungle होऊ नये हा त्या मागचा उद्धेश. . !
पण तिथे पोचण्या आधीच परतवाडा ते रुइपठार ह्या ST च्या लाल डब्याने घाटात लोटांघण घातलं. . घाटातल्या एका वळणावर काय झाले माहित नाही पण गाडी कठडा तोडून खाली गेली .

दरीतून वर आल्यावर दुसऱ्या एका ST ने आम्हाला परतवाडा सरकारी दवाखान्यात नेलं .मैत्री चे स्थानिक कार्यकर्ते आमच्या मदतीसाठी तिथे आधीच हजर झालेले . . TT चं injection आणि सरकारी उपचार झाल्या नंतर आम्ही परतवाड्याहून अमरावती ला आलो. काकांचा X-ray काढला. . ७ बरगड्या fracture होत्या !!
त्या दिवशी अमरावतीला पालाश च्या आत्या -काकां कडे राहून विदर्भीय पाहुणचार घेतला.

काकांना झालेले fracture आणि आम्हालाही दुखापत झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी नागपूर वरून flight येण्याचा निर्णय घेततला.  नागपूर वरून पुण्याला निघताना अर्धा तास आधी घरी फोन करून पराक्रम सांगितला. . आणि  २५ ला रात्री ११:३० ला पुण्यात पोचलो.

एकुणच मेळघाट प्रवास थरारक आणि बरच काही नवीन शिकवणारा होता . . आणीबाणीच्या वेळी आपण लोकांना मदत केली याचं समाधान होतं…मैत्री चे कार्यकर्ते , पालाश चा भाऊ सौरभ त्याने आयत्या वेळी आमच्या साठी केलेली धावपळ . . आत्या , काकां  आणि घरच्यांनी प्रेमानं केलेलं आगत्य ,घेतलेली काळजी . . ७ बरगड्या तुटूनही शांत राहिलेले दांडेकर काका. . आमच्या मदतीसाठी पुण्याहून आलेले श्रीराम रामदासी आणि अतुल कुलकर्णी काका. . मैत्री च्या विनिता ताई . . त्या st चा conductor . .
आणि असं अजून बराच काही . .

मी , पलाश आणि दांडेकर काका
असो . . देवाची कृपा म्हणा किंवा घरच्यांची पुण्याई . . धडधाकट घरी परत आलो.. .
सर सलामत तो पगडी पचास . .

पुण्याला निघताना विमानाची वाट बघत असताना , पलाश नि काकांना विचारला कि अपघात होण्या आधी तुम्ही गाडीत कोणत पुस्तक वाचत होतात ?


त्यावर काका म्हणाले " कर्माचा सिद्धांत " . . . . . . . .
Read more...

पसायदान

>> Monday, February 2, 2015

ज्ञान सेतू साठी महाराष्ट्रा बाहेरून आलेल्या पाहुण्यांना आम्ही ही फ्रेम भेट म्हणून दिलि.
मराठी calligraphy मध्ये पसायदान आणि त्याचा इंग्लिश मध्ये अर्थ. .

Read more...

ज्ञान-सेतू मेळावा

>> Saturday, January 17, 2015


Read more...

ज्ञान सेतू - एक अभिनव उपक्रम. . !

>> Thursday, January 1, 2015

२०१२ सालच्या मार्च महिन्या मध्ये मी व आमचे काही सहकारी नागालॅंड ला विज्ञान शिबीर घेण्यासाठी गेलो होतो. त्याचा वृतांत मी मागच्या नागालँड चे मित्र बनूया... या पोस्ट मध्ये सविस्तर पणे दिलाच आहे.

त्याच उपक्रमाचे आता मोठ्या स्वरुपात रुपांतर करून एक मोठी चळवळ उभी करण्याचे प्रयत्न आम्ही करत आहोत.

ज्ञान प्रबोधिनी च्या EARC ( Educational Activity Research Center ) अंतर्गत भारताच्या दुर्गम आणि कमी विकसित राज्यांमधील विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक विकासासाठी " ज्ञान सेतू " हा स्वयंसेवी उपक्रम हातात घेतला आहे. सध्या असोम , अरुणाचल प्रदेश , मेघालय , सिक्कीम , छत्तीसगड , ओदिषा , झारखंड , जम्मू - काश्मीर आणि  नागालँड या राज्यांमध्ये ज्ञान सेतू चे स्वयंसेवक काम करत आहेत.

सर्वसाधारण tourist म्हणून फिरायला जाणं आणि ज्ञान सेतू च्या उपक्रमातून तिथल्या शाळेत जाणं , तिथल्या स्थानिक लोकांत मिसळून त्यांच्याशी गप्पा मारणं , science -workshops घेणं यात जमीन अस्मानाचा फरक असतो . खूप चांगल्या प्रकारे आपण तो प्रदेश जवळून पाहू आणि अनुभवू शकतो. साधारणतः ६ ते १५ दिवसांसाठी स्वयंसेवक science -workshops घेयासाठी वेगवेगळ्या प्रदेशात जातात. जाण्या अगोदर workshops चे प्रशिक्षण इथेच दिले जाते. हा खालचा विडिओ बघून आपल्याला उपक्रमाची कल्पना येईल . . .

प्रत्येक प्रदेशां मध्ये तिथल्या स्थानिक स्वयाव्सेवक संस्था आपल्या बरोबर काम करत आहेत. बचपन बनाव , विवेकानंद केद्र , राष्ट्रीय सेवा भारती , Research Institute of World’s Ancient Traditions Cultures & Heritage अशा संस्थांचे फार मोठे काम या राज्यांमध्ये चालते. 
याच उपक्रमाचा एक भाग म्हणून येत्या २६ जानेवारी २०१५ ला ज्ञान सेतू मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. जाउन आलेले स्वयंसेवक , जाण्यास इच्छुक असलेले स्वयंसेवक , मार्गदर्शक  आणि स्थानिक सस्थांचे प्रतिनिधी अशांचा मोठा मेळावा ज्ञान प्रबोधिनी मध्ये होणार आहे.

अधिक माहिती साठी ज्ञान सेतू च्या website ला आपण भेट देऊ शकता . . . 

https://gyansetu-earc.in/


फेसबुक पेज : 

https://www.facebook.com/pages/Gyan-Setu/365034473625851 

ज्ञान सेतू च्या माध्यमातून दुर्गम राज्यांमध्याला मित्रांशी मैत्रीचे सेतू तयार करण्या साठी आपणही या उपक्रामात सहभागी होऊ शकता. 

अधिक माहितीसाठी काळ -वेळाचे भान न ठेवता मला फोन अथवा E-mail करू शकता . . 

ॐकार देशमुख 
मो.नो.  : ९८२२५२५६६२
E-mail - deshmukhomkar@gmail.com 


Read more...
Related Posts with Thumbnails

Total Pageviews

eXTReMe Tracker

  © Blogger template Inspiration by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP