ज्ञान सेतू - एक अभिनव उपक्रम. . !

>> Thursday, January 1, 2015

२०१२ सालच्या मार्च महिन्या मध्ये मी व आमचे काही सहकारी नागालॅंड ला विज्ञान शिबीर घेण्यासाठी गेलो होतो. त्याचा वृतांत मी मागच्या नागालँड चे मित्र बनूया... या पोस्ट मध्ये सविस्तर पणे दिलाच आहे.

त्याच उपक्रमाचे आता मोठ्या स्वरुपात रुपांतर करून एक मोठी चळवळ उभी करण्याचे प्रयत्न आम्ही करत आहोत.

ज्ञान प्रबोधिनी च्या EARC ( Educational Activity Research Center ) अंतर्गत भारताच्या दुर्गम आणि कमी विकसित राज्यांमधील विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक विकासासाठी " ज्ञान सेतू " हा स्वयंसेवी उपक्रम हातात घेतला आहे. सध्या असोम , अरुणाचल प्रदेश , मेघालय , सिक्कीम , छत्तीसगड , ओदिषा , झारखंड , जम्मू - काश्मीर आणि  नागालँड या राज्यांमध्ये ज्ञान सेतू चे स्वयंसेवक काम करत आहेत.

सर्वसाधारण tourist म्हणून फिरायला जाणं आणि ज्ञान सेतू च्या उपक्रमातून तिथल्या शाळेत जाणं , तिथल्या स्थानिक लोकांत मिसळून त्यांच्याशी गप्पा मारणं , science -workshops घेणं यात जमीन अस्मानाचा फरक असतो . खूप चांगल्या प्रकारे आपण तो प्रदेश जवळून पाहू आणि अनुभवू शकतो. साधारणतः ६ ते १५ दिवसांसाठी स्वयंसेवक science -workshops घेयासाठी वेगवेगळ्या प्रदेशात जातात. जाण्या अगोदर workshops चे प्रशिक्षण इथेच दिले जाते. हा खालचा विडिओ बघून आपल्याला उपक्रमाची कल्पना येईल . . .

प्रत्येक प्रदेशां मध्ये तिथल्या स्थानिक स्वयाव्सेवक संस्था आपल्या बरोबर काम करत आहेत. बचपन बनाव , विवेकानंद केद्र , राष्ट्रीय सेवा भारती , Research Institute of World’s Ancient Traditions Cultures & Heritage अशा संस्थांचे फार मोठे काम या राज्यांमध्ये चालते. 
याच उपक्रमाचा एक भाग म्हणून येत्या २६ जानेवारी २०१५ ला ज्ञान सेतू मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. जाउन आलेले स्वयंसेवक , जाण्यास इच्छुक असलेले स्वयंसेवक , मार्गदर्शक  आणि स्थानिक सस्थांचे प्रतिनिधी अशांचा मोठा मेळावा ज्ञान प्रबोधिनी मध्ये होणार आहे.

अधिक माहिती साठी ज्ञान सेतू च्या website ला आपण भेट देऊ शकता . . . 

https://gyansetu-earc.in/


फेसबुक पेज : 

https://www.facebook.com/pages/Gyan-Setu/365034473625851 

ज्ञान सेतू च्या माध्यमातून दुर्गम राज्यांमध्याला मित्रांशी मैत्रीचे सेतू तयार करण्या साठी आपणही या उपक्रामात सहभागी होऊ शकता. 

अधिक माहितीसाठी काळ -वेळाचे भान न ठेवता मला फोन अथवा E-mail करू शकता . . 

ॐकार देशमुख 
मो.नो.  : ९८२२५२५६६२
E-mail - deshmukhomkar@gmail.com 


Stumble Upon Toolbar

0 प्रतिक्रीया:

Related Posts with Thumbnails

Total Pageviews

eXTReMe Tracker

  © Blogger template Inspiration by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP