पुनरुत्थान समरसता गुरुकुलम - चिंचवड
>> Monday, December 29, 2014
गिरीश प्रभुणे नी चालू केलेल्या "पुनरुत्थान समरसता गुरुकुलम" मध्ये काम करण्याची मला संधी मिळाली हे मी माझं भाग्यच समजतो.
चिंचवड गावातली गुरुकुल ची वस्ती शाळा एकदा तरी भेट देऊन बघण्या सारखी आहे आणि सोबत गिरीशजी असतील तर आपण भारावून गेल्याशिवाय राहणार नाही.
गुरुकुल मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यासाठी एक छोटेखानी प्रयोग शाळा असावी असा विचार गिरीशजी च्या मनात होता . पारंपारिक ज्ञानाला विज्ञानाची जोड देऊन मुलांनी शिकावं हे ह्या मागचं उद्दिष्ट . . प्रदीर्घ चर्चा आणि बैठकां नंतर इन्फोसिस च्या 'स्पर्श' गटाने आर्थिक मदत देण्याची तयारी दाखवली .
काम सुरु होण्या आधीचा हा फोटो . शाळेतल्याच एका वर्गाची प्रयोग शाळा करायचे होती.
Architecture आणि Construction ची जबाबदारी मी साभाळली .
अडगळी च्या खोली प्रमाणे असलेल्या या जागेत बरेच बदल करावे लागणार होते . नवीन भिंती ,खिडक्या , प्रयोग शाळेचं समान. . . अणि हे सर्व २० दिवस आणि कमी खर्चात . !
इन्फोसिस चे कार्यकर्ते , कंत्राटदार आणि आम्ही सर्वांनी ठरलेल्या वेळेत प्रयोग शाळा चालू करण्यासाठी जोरात कामाला सुरुवात केली. . . असंख्य अडचणी , on-site problems , चर्चा या नंतर २० दिवसांनी प्रयोग शाळा पूर्ण झाली. लगेचच दीपोत्सव साजरा करून प्रयोग शाळेचं उद्घाटन झालं .
पूर्ण झाल्या नंतर चे काही फोटोस .
गुरुकुल सारख्या शाळेत गिरीशजी बरोबर काम करण्याचा आनंद आणि समाधान काही वेगळच … !
गुरुकुल चे facebook page.
2 प्रतिक्रीया:
तुमचा हा लेख वाचल्यावर माझ्या गावातील बीड जिल्ह्यामध्ये डोमरी गावातील सोनदरा गुरुकुल ची आठवण झाली... छान आहे हा ब्लॉग... शुभेच्छा😊💐🎻
गौशाळेत देशी गाई असाव्यात असं वाटतं. गुरुकुल शिक्षणपद्धती छान आहे.
Post a Comment