-

नवीन फ्लॅट बुक करताना - #१

>> Wednesday, March 1, 2017

नमस्कार मित्रहो ,

नवीन DP - जुना DP , मोदींच निश्चलनीकरण , संथ बाजार या मुळे  नवीन घर अथवा फ्लॅट घेणारे जरा संभ्रमात आहेत ..so as an architect म्हणून माझ्या कडून थोडी माहिती सांगतोय..

कुठे फ्लॅट घ्यावा , कुठला बिल्डर चांगला , एरिया कुठला चांगला , रेट किती , रेरा चा काय करायचं ह्याची माहिती तुम्ही रवी करंदीकरांच्या ब्लॉग वर वाचू शकता.. 😜

मी फक्त architectural view सांगणार आहे..

बरं..

सर्वात प्रथम किती आकाराचं फ्लॅट घ्यावा ..सध्या पुण्यात 1BHK, 1.5 BHK ,2 BHK 2.5 BHK ,3BHK ,4BHK , 5BHK , ५०० sq.ft.  तो ५००० sq.ft  चे फ्लॅट्स मिळतात . सर्व व्यवहार हा सेलेबल  एरिया वर चालतो.  साधारणतः  architect  लोक , सेलेबल डोक्यात ठेवूनच design  करतात ..कारण सध्या च्या मार्केट मध्ये ticket size ला जास्त महत्व आला आहे .. म्हणजे २५ लाखात १ bhk  , ४५ लाखात २ bhk , वगरे .. so , फ्लॅट डडिसाईन सुद्धा ही अंतिम किंमत डोक्यात ठेऊनच केला जातो .

समाज १० फूट X १० फूट ची रूम असेल तर..
कार्पेट एरिया झाला १०० sq.ft.
बिल्ट उप एरिया म्हणजे कार्पेट एरिया अधिक बाजूच्या भिंती , so ६ इंच जाडीच्या भिंती पकडल्या तर , बिल्टउप एरिया झाला १२१ sq.ft.  .
तर सेलेबल एरिया हा बिल्डर ठरवतो , सध्या पुण्यात ३५% सेलेबल कार्पेट वर add करतात ..
सो आपला सेलेबल एरिया झाला १३५ sq.ft.

हा सेलेबल एरिया आला कुठून?

तर तुमच्या फ्लॅट चा कार्पेट एरिया अधिक बाहेरील पॅसेज  , लिफ्ट , जिना , कॉमन  एरिया  , क्लब हाऊस ह्या सर्वांचं वाढीव एरिया बिल्डर सर्व फ्लॅट्स मध्ये विभागतो आणि जो येतो तो % , सेलेबल..

पुण्यामध्ये साधारण ३५ टक्के एरिया कार्पेट मध्ये वाढवून सेलेबल काढला जातो.. पण तो ३५% असतोच असा नाही..कमीही असून शकतो.. commercial शॉप्स , ऑफिसेस साठी साधारण ४५ ते ५० टक्के लोडींग धरल जातं .  मुंबई मधेही residential फ्लॅट्स ना ४५% लोडींग असत..

या प्लॅन मधून सेलेबल , कार्पेट आणि बिल्ट उप मधला फरक लक्षात येईल.


FSI calculations हे बिल्ट उप एरिया वर केले जातात. बिल्ट उप एरिया च्या १५% बाल्कनी आपण वाढीव वापरू शकतो. अर्थातच काही प्रीमियम भरून . २०% पर्यंत टेरेस फ्री मिळते. आत्ताच्या नवीन DP नुसार १५% बाल्कनी जी पूर्वे रूम मध्ये जोडून घ्यायची परवानगी होती , ( enclosed बाल्कनी) ती आता पुन्हा काढून टाकण्यात आली आहे .
ह्या वर construction लॉबी मध्ये भरपूर चर्चा चालू आहे...काही महिन्यात त्यावर पुनर्विचार होईलच .
नवीन रेरा नियमतानुसार याला पुढील सर्व व्यवहार हे कार्पेट एरिया वर करण्याचे निर्देश आहेत , त्या मुले पुढील व्यवहार हे कार्पेट एरिया आणि square मीटर मध्ये करावे लागणार आहेत.

so  , फ्लॅट बुक करताना नेहमी योग्य size असलेला terrace, बघूनच फ्लॅट बुक करावा .  १ bhk ला खूप मोठी terrace , अथवा २ bhk  ला २ टेरेसेस असतील तर आपण वापरत असलेला कार्पेट आणि विकत घेताना मध्ये आलेला सेलेबल एरिया ह्यात तफावत निर्माण होऊन आपलेच नुकसान होईल. साधारण ८ फूट X ८ फूट आकाराची terrace २ BHK साठी आदर्श आहे. ड्राय बालकनी साधारण ५ फूट X  ८ फूट असल्यास त्या मध्ये वॉशिंग मशीन , युटिलिटी आणि कपडे वाळत घालण्यासाठी पुरेशी जागा मिळते.  त्याहून लहान बाल्कनी असेल तर मग वॉशिंग मशीन साठी दुसरी जागा शोधावी लागेल .  पॅरलल किचन असेल तर ८ फूट लांबीचा किचन ओटा पुरेसा आहे. सध्या ओपन किचन चा ट्रेंड आहे , ज्यात ब्रेकफास्ट काउंटर जोडलेला असतो. फ्लॅट बघताना बेडरूम मध्ये बेड पोसिशन , वॉर्डरोब , ड्रेसिंग , स्टडी ची जागा पुरेशी आहे ना ह्याची खात्री करून घ्यावी.  १ BHK  फ्लॅट मध्ये बाथ आणि  WC वेगळ असलेला सोयीस्कर असत  . २ BHK  मध्ये १ attached आणि १ कॉमन आपण वापरू शकतो.  लिविंग रूम ला जरा एक छोटी एंट्रन्स लॉबी असेल तर त्याचा उपयोग चप्पल स्टॅन्ड , सीटिंग साठी करता येतो आणि बाहेरील व्यक्ती अचानक समोर येत नाही , साधारण ४' X ५' चे छोटी लॉबी असणं कधीही चांगलं.

सध्या , घर , फ्लॅट , प्लॉट , घेताना वास्तुशास्त्र बद्दल नक्की विचार करतात , this thing is being very personal , मी त्यावर काही कंमेंट करणार नाही.  ह्या पोस्ट वर तुम्हाला काही शंका असतील तर नक्की कंमेंट करा . पुढच्या पोस्ट मध्ये कुठल्या मजल्या  वरचा , कोणत्या दिशेचा फ्लॅट असावा ह्या बद्दल थोडी माहिती टाकेन..

भेटूच..   







Read more...
Related Posts with Thumbnails

Total Pageviews

Follow me on Blogarama
Netbhet.com  मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!
marathisuchi - free marathi link sharing website & marathi blogs aggregator
Blogvani.com
eXTReMe Tracker

  © Blogger template Inspiration by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP