-

Maggie "Her Majesty"

>> Saturday, June 13, 2020

I don't remember the first day of school, but I do remember the day I ate for the first time.
When I was 4-5 years old, thats around 1990, my aunt passed the steamed Maggie in front of me and my elder brother taught me , how to eat it...From then until today, 30-32 years of Maggie's craving, it is difficult to escape even in this life ...


As a child, my mother used to make Maggie on Sunday mornings and we used to eat it while watching DuckTales, Mowgli, Captain Vyom. What fun it used to be ..! At that time we both used to fill our tummies in a Maggie's single packet..the packet used to be big in quantity . Now it has become so small that I only need two packets .. flour, chicken, spicy flavor there are many flovours are available in the market but Masala is my favorite ..!

From the age of ten until I got married, I could only make two dishes like Maggie and a cup of tea..
Everything was running on it..Egg Maggie, Cheese Maggie, Maggie with vegetables at mother's request, everything was done, but only Maggie with plain Maggie masala, nothing comes near of it..! Put some Maggie Magic masala cubes in it .. ahaha .
I tell my mother and wife that Maggie is the 15th gem found in Samudra Manthan. But as soon as Maggie came out, it was ate by the gods and demons, so they say that there are only 14 gems...Anyway .. they don't like it .. try adding some Maggie Magic masala while making omelette .. what a special taste ..!


In the trek to Prabalgad, Monish and I grabbed 2 packets of Maggie, the hot Maggi eaten in the snow during the trek to Dalhousie , Wholesale Maggie for 32 people during Pratap Gad Trek, Late night Maggie after submissions, Maggie on the chulha , Many such memories are associated with Maggie. But in spite of all this, I don't remember a single time when it was wasted or thrown away.


In mid-2015, there was a lot of talk about Maggie. I wondered if they would Ban it or what .. but then it was sorted out ..I immediately ordered a 12 pack of Maggie from Snapdeal. Some may say that, Maggie is a foreign food. Now that the winds of self-sufficiency have begun to blow, it also comes to our mind to buy something of Indian brand, so Top Ramon, Yippy Noodle, Patanjali Noodle all tried, but Maggie's test is unique .. and as long as no alternative is available..there is no other option than Maggie .. !!

Our next generation is also a fan of Maggie and especially Maggie made by me.
The expectation is that Maggie will continue to supply our beaks as it has maintained the quality so far .. !!

Read more...

मॅगी "महात्म्य"

मला शाळेचा पहिला दिवस आठवत  नाही , पण मॅगी पहिल्यांदा खाल्लेला दिवस निट आठवतोय.. ४-५ वर्षांचा असताना , म्हणजे साधारण १९९० साली वगरे , काकू नी ताटलीमध्ये वाफाळलेली मॅगी पुढे केली आणि दादांनी ती कधी खायची ते शिकवलं ..तेव्हापासून आजपर्यंत ३०-३२ वर्ष मॅगी ची जी चटक लागलीये , ती आता या जन्मात तरी सुटणं अवघड आहे...




लहानपणी आई रविवारी सकाळी मॅगी करून द्यायची आणि आम्ही डक टेल्स , मोगली , कॅप्टन व्योम बघत ती खायचो.. काय मजा असायची..! त्या वेळी एका मॅगी च्या पॅकेट मध्ये आमच्या दोघांचं पोट भरायचं..पॅकेट मोठ असायचं ..आता ते इतका लहान झालय कि मलाच दोन पॅकेट लागतात.. आटा , चिकन , चटपटा फ्लेवर असतात पण बेसिक मसाला इज माय फेवरीट ..!

पाचवी ते लग्न होई पर्यंत मॅगी आणि एक कप चहा असे दोनच पदार्थ मला बनवता येत होते.. त्यावर सगळं भागायचं .. अंडा मॅगी , चीज मॅगी , आईच्या आग्रहाखातर भाज्या घालून केलेली मॅगी सगळे प्रकार करून झाले , पण फक्त मॅगी मसाला घालून केलेल्या प्लेन मॅगी ची सर कशालाही येत नाही ..त्यात थोडा मॅगी मॅजिक मसाला क्युब्स घातले कि ..अहाहा .. थोडासा पाणी जास्त ठेवायचं ..बस्स.. मी तर आईला आणि बायकोला म्हणतो कि मॅगी हे समुद्र मंथनात मिळालेलं १५ वं रत्न आहे. पण ते बाहेर आल्या नंतर लगेचच देवांनी आणि राक्षसांनी संपवून टाकल्यामुळे १४च रत्न आहेत असा म्हणतात.. असो..त्यांना काही ते पटत नाही.. तुम्हीसुध्या ऑम्लेट करताना  थोडा मॅगी मॅजिक मसाला घालून बघा ..काय विशेष चव येते..! 

प्रबळगड च्या ट्रेक मध्ये मी आणि मनीष नि २ पॅकेट मॅगी फस्त  केली होती , डलहौसी च्या ट्रेक च्या वेळी बर्फात खाल्लेली गरम गरम मॅगी.. , प्रताप गड ट्रेक च्या वेळी ३२ जणांसाठी केलेली मॅगी व्होलसेल मॅगी , सबमिशन्स करून झाल्यावर रात्री ३ वाजता केलेली मॅगी , चुलीवरची मॅगी , अशा कित्येक आठवणी मॅगी शी जोडलेल्या आहेत. पण इतकं असूनही फसलेली किंवा टाकून देण्याची वेळ अली अस काही मला आठवतं नाही. 

मध्यंतरी २०१५ साली  , मॅगी वर बरीच चर्चा झाली होती. मला वाटलं बॅन वगरे करतात कि काय.. पण नंतर ओके झालं ..लगेच स्नॅपडील वरून मी मॅग्गी चा १२ चा पॅक मागवलं' होतं .. तसं म्हंटलं तर मॅगी हे एक विदेशी खाद्य आहे.. आता आत्मनिर्भर चं वारं वाहू लागल्यानंतर आपल्याही मनात येतं कि भारतीय ब्रँड चा काहीतरी घ्यावा , सो टॉप रेमन , यीप्पी नूडल , पतंजली नूडल सगळे ट्राय केले , पण मॅगी ची टेस्ट कशालाच नाही.. आणि जो पर्यंत पर्याय उपलब्ध होत नाही ..तू पर्यंत मॅगी लाही पर्याय नाही..!! 

आमची पुढची पिढी सुद्धा मॅगी ची आणि खास करून बाबा नि केलेल्या मॅगी ची फॅन आहे .. 
मॅगी ने आत्तापर्यन्त जशी क्वालिटी टिकवून ठेवून आपले चोचले पुरवले आहेत तसेच पुढेही पुरवत राहील हीच अपेक्षा.. !! 












Read more...
Related Posts with Thumbnails

Total Pageviews

Follow me on Blogarama
Netbhet.com  मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!
marathisuchi - free marathi link sharing website & marathi blogs aggregator
Blogvani.com
eXTReMe Tracker

  © Blogger template Inspiration by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP