मॅगी "महात्म्य"
>> Saturday, June 13, 2020
मला शाळेचा पहिला दिवस आठवत नाही , पण मॅगी पहिल्यांदा खाल्लेला दिवस निट आठवतोय.. ४-५ वर्षांचा असताना , म्हणजे साधारण १९९० साली वगरे , काकू नी ताटलीमध्ये वाफाळलेली मॅगी पुढे केली आणि दादांनी ती कधी खायची ते शिकवलं ..तेव्हापासून आजपर्यंत ३०-३२ वर्ष मॅगी ची जी चटक लागलीये , ती आता या जन्मात तरी सुटणं अवघड आहे...
लहानपणी आई रविवारी सकाळी मॅगी करून द्यायची आणि आम्ही डक टेल्स , मोगली , कॅप्टन व्योम बघत ती खायचो.. काय मजा असायची..! त्या वेळी एका मॅगी च्या पॅकेट मध्ये आमच्या दोघांचं पोट भरायचं..पॅकेट मोठ असायचं ..आता ते इतका लहान झालय कि मलाच दोन पॅकेट लागतात.. आटा , चिकन , चटपटा फ्लेवर असतात पण बेसिक मसाला इज माय फेवरीट ..!
पाचवी ते लग्न होई पर्यंत मॅगी आणि एक कप चहा असे दोनच पदार्थ मला बनवता येत होते.. त्यावर सगळं भागायचं .. अंडा मॅगी , चीज मॅगी , आईच्या आग्रहाखातर भाज्या घालून केलेली मॅगी सगळे प्रकार करून झाले , पण फक्त मॅगी मसाला घालून केलेल्या प्लेन मॅगी ची सर कशालाही येत नाही ..त्यात थोडा मॅगी मॅजिक मसाला क्युब्स घातले कि ..अहाहा .. थोडासा पाणी जास्त ठेवायचं ..बस्स.. मी तर आईला आणि बायकोला म्हणतो कि मॅगी हे समुद्र मंथनात मिळालेलं १५ वं रत्न आहे. पण ते बाहेर आल्या नंतर लगेचच देवांनी आणि राक्षसांनी संपवून टाकल्यामुळे १४च रत्न आहेत असा म्हणतात.. असो..त्यांना काही ते पटत नाही.. तुम्हीसुध्या ऑम्लेट करताना थोडा मॅगी मॅजिक मसाला घालून बघा ..काय विशेष चव येते..!
प्रबळगड च्या ट्रेक मध्ये मी आणि मनीष नि २ पॅकेट मॅगी फस्त केली होती , डलहौसी च्या ट्रेक च्या वेळी बर्फात खाल्लेली गरम गरम मॅगी.. , प्रताप गड ट्रेक च्या वेळी ३२ जणांसाठी केलेली मॅगी व्होलसेल मॅगी , सबमिशन्स करून झाल्यावर रात्री ३ वाजता केलेली मॅगी , चुलीवरची मॅगी , अशा कित्येक आठवणी मॅगी शी जोडलेल्या आहेत. पण इतकं असूनही फसलेली किंवा टाकून देण्याची वेळ अली अस काही मला आठवतं नाही.
मध्यंतरी २०१५ साली , मॅगी वर बरीच चर्चा झाली होती. मला वाटलं बॅन वगरे करतात कि काय.. पण नंतर ओके झालं ..लगेच स्नॅपडील वरून मी मॅग्गी चा १२ चा पॅक मागवलं' होतं .. तसं म्हंटलं तर मॅगी हे एक विदेशी खाद्य आहे.. आता आत्मनिर्भर चं वारं वाहू लागल्यानंतर आपल्याही मनात येतं कि भारतीय ब्रँड चा काहीतरी घ्यावा , सो टॉप रेमन , यीप्पी नूडल , पतंजली नूडल सगळे ट्राय केले , पण मॅगी ची टेस्ट कशालाच नाही.. आणि जो पर्यंत पर्याय उपलब्ध होत नाही ..तू पर्यंत मॅगी लाही पर्याय नाही..!!
आमची पुढची पिढी सुद्धा मॅगी ची आणि खास करून बाबा नि केलेल्या मॅगी ची फॅन आहे ..
मॅगी ने आत्तापर्यन्त जशी क्वालिटी टिकवून ठेवून आपले चोचले पुरवले आहेत तसेच पुढेही पुरवत राहील हीच अपेक्षा.. !!
0 प्रतिक्रीया:
Post a Comment