कानातलं ...मनातलं ..
>> Wednesday, September 4, 2024
आज शिक्षक दिन ... गेल्या १ आठवड्यापासून आमच्या अस्मि ताईंना ५ संप्टेंबर कधी येतोय असं झाला होतं ...
आज ती मोठ्या गटात ताई म्हणून शिकवायला जाणार आहे ... अस्मि , माझी मोठी मुलगी .. ६ वी मध्ये आहे ..
मी हा ड्रेस घालणार आहे , हे चित्र शिकवणार आहे आणि आम्हाला गणवेशाला सुट्टी आहे ... कारण आम्ही ताई म्हणून जाणार आहोत ..!!
किती उत्साह .. !!
ड्रेस कुठला घालायचा , गाणी कोणती घ्यायची याची गेले २/३ दिवस चर्चा चालू होती .. तास घेऊन झाल्यावर आम्हाला शिक्षक खोली जाऊन बसायला मिळणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नंतर कॉफी देणार आहेत ताई कडून ...!! काय काय आणि किती तरी मनात चालू होतं ..
आज सकाळी आवारत असताना ...गळयात काय घालायचं , कानात काय घालायचं ह्याची घाई चालू होती .. हा ड्रेस , हि टिकली , हे कानातलं ...
एक निवडून कानात घालत असताना मी तिच्याकडे बघतच बसलो ...कि माझं बाळ किती मोठं झालंय आता ... !!
आपापलं आवरलं , ड्रेस घातला , कानातलं निवडलं , गळ्यात माळ घातली आणि एकदम रेडी ..!!
डोळ्यात टचकन पाणी आलं ..
मूल आपल्यासमोर मोठी होतात आणि किती स्वतंत्र होतात ...
ऑफिस ला आल्यावर तिचे लहान पाणीचे व्हिडिओस , फोटोस बघण्यात किती वेळ गेला कळलंच नाही ..
बोटाला धरून चालणारी ती ..आज लहान मुलांना शिकवायला जाणार आहे.. !! मन दाटून आलं... आनंदानी ..!!
संदीप खरे चं ..दमलेल्या बापाची कहाणी गाणं खूप वेळा ऐकलं ... आणि हा ब्लॉग लिहायला घेतला ...मनातल ...
आत्ता तिला कळणार नाही ... पण मोठी झाल्यावर जेव्हा ती हे वाचेल तेव्हा तिच्याही डोळ्यात पाणी येईल कदाचित... !!
Read more...