महापुरातून काही धडे
>> Thursday, August 8, 2019
सांगली व कोल्हापूर येथे आलेल्या पूरस्थितीने सजीव वस्तू आणि संपत्तीच्या बाबतीत भयंकर नुकसान घडवून आणले आहेत. आपण निसर्ग देवतेच्या सामर्थ्याला आव्हान देऊ शकत नाही, परंतु आपण आपल्या चुकांपासून शिकू शकतो आणि संभाव्य नुकसान टाळण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना करू शकतो.
आपले वैयक्तिक नुकसान टाळण्यासाठी , घर अथवा कोणतेही बांधकाम करण्याआधी घ्यावयाच्या ५ मूलभूत खबरदारीच्या गोष्टी मी इथे मांडत आहे .
१: ब्लू लाईन आणि रेड लाईन तपास :
- तुम्ही घर खरेदी अथवा विकत घेऊ इच्छित असलेली जागा नदीपासून किंवा कोणत्याही जलाशयापासून ५० ते १०० मीटर च्या आत असेल तर सरकारच्या पाटबंधारे विभागाने चिन्हांकित केलेल्या ब्लू लाईन आणि रेड लाईन ची त्या जागेवरील पातळी नेहमीच तपासून घेतली पाहिजे. हे मॅप्स आपल्याला पाटबंधारे विभागाच्या वेबसाईट वर सहजपणे बघायला मिळतात .
२: ब्लू लाईन पलीकडे कोणतेही बांधकाम नाही:
ब्लू लाईन हि मागील २५ वर्ष्याच्या पाण्याची सरासरी पातळी असते. ब्लू लाईन च्या पुढे कोणतेही बांधकाम अपेक्षित नसते. तरीही तिथे बांधकाम केले असल्यास , पुराचे पाणी आत शिरणार हे निश्चित. तथापि ही जागा खेळाचे मैदान, गार्डन्स किंवा हंगामी शेती म्हणून वापरली जाऊ शकते. इमारत निळ्या रेषेच्या पलीकडे असल्यास कोणताही बंगला प्लॉट, फ्लॅट खरेदी करू नका.
३: रेड लाईन आणि ब्लू लाईन च्या मधील बांधकाम.
रेड लाईन ही गेल्या 100 वर्षातल्या पुराची सरासरी पातळी आहे . रेड लाईन आणि ब्लू लाईन मधला हा भाग रेस्ट्रीक्टड झोन असतो. ह्या झोन मधील बांधकामाच्या तळमजल्याची लेवल हि रेड लाईन च्या लेवल पेक्षा किमान २' नि जास्त ठेवण्याचा नियम आहे. ह्या जागेत बेसमेंट घेणे टाळावेच.
४: बांधकामाला प्लिंथ असावीच .
- प्लिंथ हा कोणत्याही बांधकामाचा आवश्यक भाग असतो. कोणत्याही झोनची पर्वा न करता, समोरच्या रस्त्याच्या लेवल च्या वर साधारण दीड ते दोन फूट ची प्लिंथ घ्यावी , जेणेकरून रस्त्यावरचे पाणी घरात किंवा दुकानात शिरणार नाही.
५: नेहमी आर्किटेक्ट आणि स्ट्रक्चरल इंजिनीयर चा सल्ला घ्या.
जर तुम्ही रेड लाईन पलीकडील जागेचा विचार करत असाल तर बांधकाम करण्यापूर्वी आर्किटेक्ट चा जरुर सल्ला घ्यावा , आर्किटेक्ट त्या प्लॉट किंवा प्रोजेक्ट च्या आणि रेड / ब्लू लाईन चा अभ्यास करून तुम्हाला योग्य तो सल्ला देईल. अशा प्लॉट मध्ये आपण नॉर्मल फुटिंग घेऊ शकत नाही त्यामुळे कोणत्याही स्थानिक कॉन्ट्रॅक्टर ला संपूर्ण काम देण्याआधी एखाद्या स्ट्रक्चरल इंजिनीअर च्या सल्ला घ्यावा , जेणेकरून मातीच्या परिस्थितीचा अभ्यास करून योग्य प्रकारचा पाया तो डिझाईन करून देऊ शकतो.
x