करोना चा परिणाम
>> Monday, April 6, 2020
१७ मार्च पर्यंत इंटिरियर डिझाईन च्या साईट्स जोरात चालू होत्या .. २५ तारखेला , गुढी पाडव्याला पूजा करायचं प्लॅन होता.. काही ठिकाणी फाँल्स सिलिंग चा काम राहिल होतं , तर काही ठिकाणी पेंटिंग.. लॉक डाऊन च्या न्युज tv वर येत होत्या .. १९ ला भवानी पेठ , ( टिम्बर मार्केट ) चालू होतं .. २० ला तेही बंद झाल..
Read more...
२२ तारखेला जनता कर्फ्यू लागला आणि त्यानंतर तर सगळंच बंद झाला..
दुसया दिवशी पेंटर चा फोन आला कि मेरे लोग UP चाले गाये , अभी पता नाही कब वापस अएंगे ..
नोट बंदी , GST चा बांबू बसल्यापासून रिअल इस्टेट , construction मध्ये आधीच खूप स्लो डाऊन आहे.. आणि त्यात आता हा वर्मी घाव.. बरं ..आणि आमचं काम असं आहे कि आम्ही ' वर्क फ्रॉम होम' सुद्धा करू शकत नाही. दस्त नोंदणी सुध्या सध्या थांबवल्या आहेत . १५ एप्रिल नंतर जरी लॉक डाऊन शिथिल केले , तरी रिअल इस्टेट आणि बांधकाम क्षेत्राला सर्वात शेवटचा नंबर लागणार हे नक्की. म्हणजे मे एन्ड किंवा जून उजाडणार परत काम सुरु होण्यासाठी . ज्या सोसायटी चे रिडेव्हलोपमेंट चालू आहे , त्यामध्ये डेव्हलपर टेनंट ला , पर्यायी जागेसाठी भाडे देतो , ते गणित ह्या २/३ महिन्यांमुळे बदलेल. साधारणतः रिडेव्हलोपमेंट चा टाइम स्पॅम २४ ते ३० महिने पकडला जातो. त्यातले ३ महिने तर गेलेच. बिल्डर नि बँके कडून घेतलेल्या कर्जावरचे इंटरेस्ट तर चालूच राहणार आहे. लॉक डाऊन च्या आधी जे लोक UP / बिहार ला गेले , त्यांना त्यांच्या गावात डायरेक्ट न घेता , त्याना गावाबाहेर quarantine करून ठेवल आहे , त्यामुळे इकडून जाऊनही ते घरी पोचलेच नाहीयेत. करोना तर आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नांनी जाणार तर आहेच , पण करोना गेल्या नंतर आपली खरी आर्थिक कसोटी सुरु होणार आहे. येणारे ६ ते ८ महिने सर्वच क्षेत्रातल्या लोकांसाठी थोडा अवघड असणार आहे. TV वर चालू असलेल्या बातम्या , Whatsapp युनिव्हर्सिटी वरचे मोफत ज्ञान यामुळे मन अगदी भंजाळून जाते. तरी आता जसे प्रत्येकजण स्वतःची जशी काळजी घेत आहे , तशीच करोना गेल्या नंतर आपापल्या कामाची काळजी घेतली तर पटकन कामाची घडी आधीसारखी बसवता येईल. अनपेक्षितपणे आलेल्या , न दिसण्याऱ्या संकटामुळे त्याचे परिणामही काय होतील आणि अजून किती दिवस हे चालेल ह्याची कोणालाच कल्पना येत नाहीये..