-

Celebration for Sachins 200 !!

>> Sunday, February 28, 2010

कालची रात्र मी आयुष्यात कधीही विसरणार नाही.
२२ जण , सर्व वेगवेगळ्या क्षेत्रातले,एकमेकांना कधीही न भेटलेले ,एकमेकांना माहीत नसलेले एकत्र येतात..आणि भरपूर मनसोक्त मजा करतात...सेलेब्रेशन कारण एकच..सचिन चे २०० !!

संध्याकाळी हृषिकेश चा फोन आला..की आपण आज रात्री भेटतोय ,शनिवार संध्याकाळ असल्यामुळे मलाही काही काम नव्हतं , तसही आम्ही नेहमी भेटतोच ,मी ओक, डन म्हणालो..
आठला तिकडे पोचायचं असं ठरल असताना ,सव्वा आठला पुण्यातून निघालो.जाता जाता हृषि नि तयार केलेल्या सचिन च्या पोस्टरची प्रिंट काढली.चांदणी चौकातून पुढे भुगाव जवळच्या होटेलात पोचलो..
आधीपासून तिथे १५ ,२० जणं जमली होती,थोडे ओळखीचे ,थोडे अनोळखी चेहरे होते..भरपूर गप्पा चालु होत्या..तिकडे गेल्यावर मला एकूण कार्य्रक्रमाचं स्वरूप कळलं, एक मोठा अडीच किलोचा केकं , फ़टाक्यांचा बॉक्स आणून ठेवला होता.मागच्या भिंतीवर काही जणं सचीन चे पोस्टर लावत होती.एकूण वातावरण सचिनमय होतं.माझ्यासारखे इतके सगळे सचिन भक्त बघितल्यावर फार बरं वाटलं.सचिन चे रेकॉर्ड्स , शॉट्स , धोनीचा मूर्खपणा सगळ्यावर लोकं आपापलं द्न्यान पाघळत होते.गप्पा गप्पातून ओळखी होत होत्या.
बराच वेळ टाईमपास झाल्यावर सचिन च्या पोस्टर्सचं फोटोसेशन झालं, सगळ्या ग्रुप चे पण फोटो झाले. मग सचिन च्या नावाचा केकं कापण्यासाठी एकत्र जमलो..केकं कापला...कापून झाल्यावर सगळ्यांनी मिळून धोनीला मनसोक्त शिव्या घातल्या...आता शिव्या का घातल्या आणि काय घातल्या  ते विचारू नका..


असो...
मधे मांडलेल्या बैठ्या टेबलावर बसून सगळ्यानी केकं खाल्ला..काय भारी होता केकं...१ नंबर..
निरंजन ज्यानी सगळं अरेंज केलं होतं, तो सचिन बद्दल आणि कार्य्रक्रमाबद्दल थोड्यावेळ बोलला..प्रत्येकानी काहीतरी बोलायचचं असं ठरलं होतं.मग प्रत्येक जणं आपापली मतं मांडू लागली.कोणी क्रिटीक्स ना शिव्या घतल्या तर कोणि सचिनला भारत रत्न मिळावं असं म्हणाला.पण प्रत्येकाचं एकमत यावर झालं की सचिन नी २०११ च्या वर्ल्ड कप मधे पण खेळावं. मीही त्याच्याबद्दल दोन चार वक्य बोललो..ओळखी झाल्यामुळे एव्हाना भरपूर दंगा चालू झाला होता..
अकरा सडेअकराला पोटोबाची सोय झाली.

मागे माझ्या मनात विचार चालू होता...किती वेडे आहोत आपणं सचिन साठी ?..सचिन खेळला तर आपणं मॅच बघायची..सचिन आउट झाला तर टीव्ही बंद करायचा..सचिन म्हणजे भारताची आन ,बान और शान..  १ अब्ज लोकसंख्या असणाय्रा देशात इतकं अढळं स्थान मिळवलं तितकसं सोपंय का?
१६ व्या वर्षापासून खेळणारा माणूस, ४ -५  वर्षापूर्वी ज्याचं करीअर आता संपलं असं म्हटंल जात होतं तो आज वर्ल्ड रेकॉर्ड करतो..म्हणजे ८ वं आश्चर्य नाही का???
खरचं तो अगदी देव नसला तरी त्याला क्रिकेट मधला मनुष्यरूपी देव मानायला काय हरकत आहे..आणि तो आहेच खरा..मला तरी काहि वाटत  नाही की त्याची रेकॉर्ड्स आता कोणी तोडू शकेल...यशाच्या परमोच्च शिखरावर असतानाही सचिन कूठल्याही controversy पासून लांब रहातो..म्हणजे तो एक माणूस तितकाच महान आहे जितका एक क्रिकेटर..  
Hats off to Sachin , literally..!!

भरपूर दंगा ,खाणं , इ-मेल ची देवाण-घेवाण झाल्यावर आम्ही निघालो...
Thanks to Sachin की ज्याच्या मुळे आम्हाला हे Celebration करायला मिळालं...आणि असे क्षण आपल्या सगळ्यांच्याच आयुश्यात येवोत हीच अपेक्षा..

('DiggThis’)

Read more...

होळी ..!!!

>> Saturday, February 27, 2010

Read more...

तुमच्या ब्लॉगचा बॅनर बनवायचा का?

>> Friday, February 26, 2010

ब्लॉग बॅनर म्हणजे काय ?
ब्लॉग बॅनर म्हणजे एक फोटो जो तुमच्या ब्लॉगशी कनेक्टेड असतो.
हा बॅनर तुम्ही तुमच्या अथवा इतर कोणाच्याही ब्लॉग वर टाकू शकता.
अर्थात त्या साठी त्या फॊटो मागे छोटा HTML कोड लिहिलेला असतो.   

ब्लोग बॅनर चा उपयोग काय ?
ब्लॉग बॅनर तुम्ही इतर कोणाच्याही ब्लॉग वर लावल्यामुळे तो ब्लॉग तुमच्या ब्लॉग शी कनेक्ट होतो.त्यामुळे त्या ब्लॉग वरील वाचकाला तुमचा ब्लॉग सहज मिळू शकतो..त्याद्वारे जास्तीत जास्त वाचकांपर्यंत ब्लॉग पोहचू शकतो. नवीन वाचक वर्ग मिळविण्यासाठी विविध आकाराचे विविध डिझाइनचे ब्लॉग बॅनर असणं आता अपरीहार्य बनलं आहे..

ब्लोग बॅनर चा आकार कसा असावा?
तुम्ही कोणत्याही आकाराचा ब्लोग बॅनर बनवू शकता , पण ब्लॉग विश्वात
१२५ पिक्सेलX१२५ पिक्सेल चे बॅनर जास्त वापरले जातात आणि ते सोयीस्करही असतात.

माझा बॅनर इतरांना त्यांच्या ब्लॉग वर लावयचा असेल तर ?
त्याकरताही एक छोटा HTML कोड HTML widget मध्ये add करावा लागतो जेणेकरून तुमच्या ब्लॉगवरचा वाचक तो कोड कॉपी करून त्याच्या ब्लॉग वर टाकू शकतो.

माझ्या ब्लॉग च्या साइडबार मध्ये ’सारथी’ चा ब्लॉग बॅनर तुम्ही बघु शकता.

इतर काही ब्लॉग बॅनर इथे बघायला मिळतील..
http://bhunga.blogspot.com/2007/04/blog-post_14.html

ब्लॉग बॅनर कसा बनवायचा ?
ह्याचं उत्तर अत्यंत सोपं आहे..
तुमच्या ब्लॉग ची url link आणि मला तुमचा एखादा आवडता फोटो जो की तुम्हाला तुमच्या ब्लॉग बॅनर ला background म्हणून लावायला आवडेल ,तो मला मेल करा . मी तुम्हाला एक HTML कोड देइन तो तुम्ही html widget मधे पेस्ट करायचा...
तुमच्याकडे फोटो नसेल तर मी माझ्याकडील फोटो वापरू शकतो.
that is your call..

माझ्या मेल आयडी वर तुम्ही URL link आणि फोटो पाठवू शकता.

deshmukhomkar@gmail.com 

 
काही background मी खाली देत आहे..

अजून काही वाचण्यासारखे..

BLOG - पैसे कमावण्याचे साधन.

Read more...

"सचिन- क्रिकेट बादशाह"

>> Thursday, February 25, 2010

२४ एप्रिल ला झाला एकाचा जन्म..
वातावरणही जणू सारे झाले होते दंग...

मुलाच्या त्या आगमनाने
घर सारे खिलले होते...
जणू सारे देवही त्याच्याच आगमनाची
वाट ते पाहत होते...

होता त्याचा जन्म फक्त
एका गोष्टीसाठी...
क्रिकेटला आपण सर्वस्व द्यायचे..
ठरवुनी मनी ते ध्येय आपले तो गाठी...


"सचिन" असे म्हणतो आपण..
आहे तो क्रिकेटचा राजा...
धारधार खेळाने आपुल्या...
वाजवतो तो सर्वांचा बेण्ड बाजा...

नाही भीती त्याला ...
समोर असलेल्या बॉलरची...
करुनी चौकाराची आतषबाजी..
पाहतो पकड आपण त्याच्या खेळाची...

नवोदितानाही खेळात प्रेरणा तो देई..
पाहताना खेळ त्या राजाचा..
मन हि आपले हरपुनी जाई...

आहेत सारे विक्रम खेळातले..
या राजाच्या नावावरती...
धावांचा हि डोंगर पाहता..
भल्या भल्यांचे डोळे फिरती...

क्रिकेटचा बादशहा तू
असाच धावांचा पाउस पडत राहा..
नाही फिकीर वयाची आपल्याला..
राजा तू असाच बहारत राहा...असाच तू बहारत राहा...

Read more...

मराठी अंक असे...

>> Wednesday, February 10, 2010

1 - एक (Ek)
2 - दोन (Don)
3 - तीन (Teen)
4 - चार (Chaar)
5 - पाच (Paach)
6 - सहा (Sahaa)
7 - सात (Saat)
8 - आठ (Aath)
9 - नऊ (Nau)
10 - दहा (Dahaa)
100 - शंभर (Shambhar)
1,000 - हजार (Hazaar)
10,000 - दहा हजार (Dahaa Hazaar)
1,00,000 - लाख (Laakh)
10,00,000 - दहा लाख (Dahaa Laakh/Dasha-Laksha)
1,00,00,000 - कोटी Kotee)
10,00,00,000 - दहा कोटी (Dahaa Kotee/Dasha-Kotee)
1,00,00,00,000 - अब्ज (Abja)
10,00,00,00,000 - खर्व (Kharva)
1,00,00,00,00,000 - निखर्व (Nikharva)
10,00,00,00,00,000 - महापद्म (MahaaPadma)
1,00,00,00,00,00,000 - शंकु (Shanku)
10,00,00,00,00,00,000 - जलधि (Jaladhi)
1,00,00,00,00,00,00,000 - अंत्य (Antya)
10,00,00,00,00,00,00,000 - मध्य (Madhya)
1,00,00,00,00,00,00,00,000 - परार्ध (Paraardha)

Read more...

FWD: ऐक क्वार्टर कमी पडते

>> Tuesday, February 9, 2010

FWD : ऐक क्वार्टर कमी पडते

दारु काय गोष्ट आहे
मला अजुन कळली नाही
कारण प्रत्येक पीणारा म्हणतो
मला काहीच चढली नाही

सर्व सुरळीत सुरु असताना
लास्ट पॅकपाशी गाडी अडते
दर पार्टीच्या शेवटी ऐक क्वार्टर कमी पडते

पीण्याचा प्रोग्राम म्हणजे जणु
वीचारवंतची गोलमेज परीषदच भरते
रात्री दीलेला शब्द प्रत्येकजण
सकाळच्या आत विसरते

मी इतकीच घेणार असा प्रत्येकाचा ठरलेला कोटा असतो
पॅक बनवनारा त्यदिवशी जग बनवनार्‍यापेक्षा मोठा असतो
स्वताच्या स्वार्थासाठी प्यायच्या आग्रहाचा कार्यक्रम घडते
दर पार्टीच्या शेवटी ऐक क्वार्टर कमी पडते

पीण्याचा कार्यक्रम पीणार्‍याला दरवेळेस नवीन पर्व असते
लोकांना अकँडेमीक्सपेक्षा पीण्याचा क्षमतेवर गर्व असते
आपण हीच घेतो म्हणत ऐकमेकाचे ब्रँडप्रेम जागवतात
वेळ आली आणि पैसा नसला की देशीवरही तहान् भागवतात

शेवटी काय दारु दा‍रु असते
कोणतीही चढते
दर पार्टीच्या शेवटी ऐक क्वार्टर कमी पडते

पीणार्‍यामध्ये प्रेम हा चर्चेचा पहीला वीषय आहे
देवदासचे खरे प्रेम पारो की दारु मला अजुन संशय आहे
प्रत्येक पॅकमागे तीची आठवण दडली असते
हा बाटलीत बुडला असतो
ती चांगल्या घरी पडली असते
तीच्या आठवणीत थर्टीची लेवल लगेच सिक्स्टीला भीडते
दर पार्टीच्या शेवटी ऐक क्वार्टर कमी पडते

चुकुन कधीतरी गंभीर वीषयावरही चर्चा चालतात
सर्वेजण मग त्यावर P.HD. केल्यासारखे बोलतात
प्रत्येकाला वाटतेकी त्यालाच यामधले जास्त कळते
ग्लोबल वार्मिंगची चर्चा गावच्या पोटनीवडणुकीकडे वळते
जसा मुद्दा बदलतो तसा आवाज वाढते
दर पार्टीच्या शेवटी ऐक क्वार्टर कमी पडते

फेकणे , मोठोपणा दाखवणे याबाबतीत् यांच्यासारखा हात नाही
ऐरवी सींगल समोसा खाणारा गोष्टीत पीझ्झाशीवाय् खात नाही
पैशे काय आहे ते फक्त खर्च करासाठीच असतात
पॅकजवळ झालेली अशी गणिते सकाळी चहाच्या कटींगपाशी फसतात

रात्री थोडी जास्त झाली मग त्याला कळते
दर पार्टीच्या शेवटी ऐक क्वार्टर कमी पडते

यांच्यामते मद्यपाण हा आयुष्याचा महत्वाचा पार्ट आहे
बीयर पीण्यामागे सायन्स तर देशी पीण्यामागे आर्ट आहे
यामुळे धीर येते ताकत येते यात वेगळीच मजा असते
आयुष्याभराचा मावळा माणुस त्या क्षणी राजा असते
याच्यामुळे आपल्याला घराच्या चिवड्याचे महत्व कळते
दर पार्टीच्या शेवटी ऐक क्वार्टर कमी पडते

Read more...
Related Posts with Thumbnails

Total Pageviews

Follow me on Blogarama
Netbhet.com  मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!
marathisuchi - free marathi link sharing website & marathi blogs aggregator
Blogvani.com
eXTReMe Tracker

  © Blogger template Inspiration by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP