Celebration for Sachins 200 !!

>> Sunday, February 28, 2010

कालची रात्र मी आयुष्यात कधीही विसरणार नाही.
२२ जण , सर्व वेगवेगळ्या क्षेत्रातले,एकमेकांना कधीही न भेटलेले ,एकमेकांना माहीत नसलेले एकत्र येतात..आणि भरपूर मनसोक्त मजा करतात...सेलेब्रेशन कारण एकच..सचिन चे २०० !!

संध्याकाळी हृषिकेश चा फोन आला..की आपण आज रात्री भेटतोय ,शनिवार संध्याकाळ असल्यामुळे मलाही काही काम नव्हतं , तसही आम्ही नेहमी भेटतोच ,मी ओक, डन म्हणालो..
आठला तिकडे पोचायचं असं ठरल असताना ,सव्वा आठला पुण्यातून निघालो.जाता जाता हृषि नि तयार केलेल्या सचिन च्या पोस्टरची प्रिंट काढली.चांदणी चौकातून पुढे भुगाव जवळच्या होटेलात पोचलो..
आधीपासून तिथे १५ ,२० जणं जमली होती,थोडे ओळखीचे ,थोडे अनोळखी चेहरे होते..भरपूर गप्पा चालु होत्या..तिकडे गेल्यावर मला एकूण कार्य्रक्रमाचं स्वरूप कळलं, एक मोठा अडीच किलोचा केकं , फ़टाक्यांचा बॉक्स आणून ठेवला होता.मागच्या भिंतीवर काही जणं सचीन चे पोस्टर लावत होती.एकूण वातावरण सचिनमय होतं.माझ्यासारखे इतके सगळे सचिन भक्त बघितल्यावर फार बरं वाटलं.सचिन चे रेकॉर्ड्स , शॉट्स , धोनीचा मूर्खपणा सगळ्यावर लोकं आपापलं द्न्यान पाघळत होते.गप्पा गप्पातून ओळखी होत होत्या.
बराच वेळ टाईमपास झाल्यावर सचिन च्या पोस्टर्सचं फोटोसेशन झालं, सगळ्या ग्रुप चे पण फोटो झाले. मग सचिन च्या नावाचा केकं कापण्यासाठी एकत्र जमलो..केकं कापला...कापून झाल्यावर सगळ्यांनी मिळून धोनीला मनसोक्त शिव्या घातल्या...आता शिव्या का घातल्या आणि काय घातल्या  ते विचारू नका..


असो...
मधे मांडलेल्या बैठ्या टेबलावर बसून सगळ्यानी केकं खाल्ला..काय भारी होता केकं...१ नंबर..
निरंजन ज्यानी सगळं अरेंज केलं होतं, तो सचिन बद्दल आणि कार्य्रक्रमाबद्दल थोड्यावेळ बोलला..प्रत्येकानी काहीतरी बोलायचचं असं ठरलं होतं.मग प्रत्येक जणं आपापली मतं मांडू लागली.कोणी क्रिटीक्स ना शिव्या घतल्या तर कोणि सचिनला भारत रत्न मिळावं असं म्हणाला.पण प्रत्येकाचं एकमत यावर झालं की सचिन नी २०११ च्या वर्ल्ड कप मधे पण खेळावं. मीही त्याच्याबद्दल दोन चार वक्य बोललो..ओळखी झाल्यामुळे एव्हाना भरपूर दंगा चालू झाला होता..
अकरा सडेअकराला पोटोबाची सोय झाली.

मागे माझ्या मनात विचार चालू होता...किती वेडे आहोत आपणं सचिन साठी ?..सचिन खेळला तर आपणं मॅच बघायची..सचिन आउट झाला तर टीव्ही बंद करायचा..सचिन म्हणजे भारताची आन ,बान और शान..  १ अब्ज लोकसंख्या असणाय्रा देशात इतकं अढळं स्थान मिळवलं तितकसं सोपंय का?
१६ व्या वर्षापासून खेळणारा माणूस, ४ -५  वर्षापूर्वी ज्याचं करीअर आता संपलं असं म्हटंल जात होतं तो आज वर्ल्ड रेकॉर्ड करतो..म्हणजे ८ वं आश्चर्य नाही का???
खरचं तो अगदी देव नसला तरी त्याला क्रिकेट मधला मनुष्यरूपी देव मानायला काय हरकत आहे..आणि तो आहेच खरा..मला तरी काहि वाटत  नाही की त्याची रेकॉर्ड्स आता कोणी तोडू शकेल...यशाच्या परमोच्च शिखरावर असतानाही सचिन कूठल्याही controversy पासून लांब रहातो..म्हणजे तो एक माणूस तितकाच महान आहे जितका एक क्रिकेटर..  
Hats off to Sachin , literally..!!

भरपूर दंगा ,खाणं , इ-मेल ची देवाण-घेवाण झाल्यावर आम्ही निघालो...
Thanks to Sachin की ज्याच्या मुळे आम्हाला हे Celebration करायला मिळालं...आणि असे क्षण आपल्या सगळ्यांच्याच आयुश्यात येवोत हीच अपेक्षा..

('DiggThis’)

Stumble Upon Toolbar

0 प्रतिक्रीया:

Related Posts with Thumbnails

Total Pageviews

eXTReMe Tracker

  © Blogger template Inspiration by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP