-

आयुष्य - छान कवीता

>> Sunday, October 19, 2008

मेल मधून ही कवीता मिळाली...
आवडली, छान आहे...
तुम्हीही वाचावी म्हणून पोस्ट करत आहे..
लेखकाचं नाव खाली नमूद केलं नव्हतं..

एकदा लग्न झालं की, आपलं आयुष्य सुखात जाईल असं आपल्याला वाटत असतं...

असा वाटण्याची जागा मग,

मूल झालं की...

मोठं घर झालं की...

अशा अनेक इच्छांच्या अंगाने वाढतच जाते.

दरम्यानच्या काळात, आपली मुलं अद्याप मोठी झालेली नाहीत. ती जरा मोठी झाली

की सारं ठीक होईल, अशी आपण मनाची समजूत घालू लागतो.



मुलांच्या वाढत्या वयात, त्यांच्या भवितव्याच्या सुंदर स्वप्नांनी आपण आपले दिवस सजवत

असतो. मुलं जरा करती सवरती झाली की सारं कसं आनंदानं भरून जाईल, असं आपल्याला

वाटत असतं.



आपला नवरा / बायको जरा नीट वागायला लागला लागली की...

आपल्या दाराशी एक गाडी आली की...

आपल्याला मनाजोगी सुटी मिळाली की...

निवृत्त झालो की...

आपलं आयुष्य कसं सुखानं भरून जाईल, असं आपण सतत स्वतःशीच घोकत असतो.



खरं असंय, की आनंदात असण्यासाठी, सुखात असण्यासाठी आत्ताच्या वेळेपेक्षा दुसरी योग्य

वेळ कोणतीही नाही.

आयुष्यात आव्हानं तर असणार आहेतच. ती स्विकारायची आणि ती झेलता झेलताच आनंदी

राहायचा निश्‍चय करायचा हेच बरं नाही का?



जगायला - खरोखरीच्या जगण्याला - अद्याप सुरुवात व्हायचीये, असंच बराच काळ वाटत

राहतं.

पण, मध्ये बरेच अडथळे असतात. काही आश्‍वासनं पाळायची असतात, कोणाला वेळ द्यायचा

असतो, काही ऋण फेडायचं असतं....

आणि अगदी शेवटी कळतं, की ते अडथळे म्हणजेच जीवन होतं.



या दृष्टिकोनातून पाहिलं की कळतं,

आनंदाकडे जाणारा कोणताही मार्ग नाही.

आनंद हाच एक महामार्ग आहे.

म्हणून प्रत्येक क्षण साजरा करा.



शाळा सुटण्यासाठी... शाळेत पुन्हा जाण्यासाठी... वजन चार किलोने कमी

होण्यासाठी... वजन थोडं वाढण्यासाठी... कामाला सुरुवात होण्यासाठी... एकदाचं

लग्न होऊन जाऊदे म्हणून... शुक्रवार संध्याकाळसाठी... रविवार सकाळसाठी...

नव्याकोऱ्या गाडीची वाट बघण्यासाठी... पावसासाठी... थंडीसाठी... सुखद

उन्हासाठी... महिन्याच्या पहिल्या तारखेसाठी... आपण थांबून राहिलेले असतो.

एकदाचा तो टप्पा पार पडला की, सारं काही मनासारखं होईल, अशी आपणच आपली

समजूत घातलेली असते. पण, असं काही ठरवण्यापूर्वी आनंदी होण्याचं ठरवा.





आता एक गोष्ट.

काही वर्षांपूर्वीची. सिएटलच्या ऑलिम्पिकमध्ये शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत

सहभागी झालेले नऊस्पर्धक स्पर्धा सुरू होण्याच्या संकेताची वाट पाहात जय्यत तयार उभे

होते. ही सारी मुलं शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या अपंग होती.



पिस्तुलाचा आवाज झाला आणि शर्यत सुरू झाली. साऱ्यांनाच पळता येत होतं असं नाही.

पण, प्रत्येकाला स्पर्धेत भाग घ्यायचा होता आणि महत्त्वाचं म्हणजे जिंकायचं होतं.



धावता धावता एकाचा तोल गेला. काही गोलांट्याखाऊन तो पडला आणि रडू लागला.

त्याच्या रडण्याचा आवाज ऐकून अन्य आठही जण पळायचे थांबले.

सारे मागे फिरले... सारे जण...



'डाउन्स सिन्ड्रोम'ची व्याधी असलेली एक मुलगी त्याच्या जवळ बसली. तिने त्याला

मिठी मारली आणि मग विचारलं, ''आता बरं वाटतंय?''

मग साऱ्यांनी त्याला उभं केलं आणि अंतिम रेषेपर्यंत सारे खांद्याला खांदा लावून चालत

गेले.



ते दृष्य पाहून मैदानावर उपस्थित असलेले सारेजण हेलावून गेले. उभे राहून मानवंदना देत

साऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. बराच काळ त्या टाळ्यांचा आवाज आसमंतात गुंजत

होता...

त्यावेळी तिथे उपस्थित असलेली मंडळी अजूनही त्या घटनेची आठवण काढतात.

का?

कुठेतरी आत खोलवर आपल्याला प्रत्येकाला ठाऊक असतं की आयुष्यातली सर्वांत महत्त्वाची

गोष्ट असते ती स्वतःसाठी जिंकण्यापेक्षा कितीतरी मोठी असते.



आयुष्यातली सर्वांत महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे इतरांना जिंकायला मदत करणं.

त्यासाठी वेळप्रसंगी आपला वेग कमी करावा लागतो किंवा अगदी शर्यतच बदलावी लागते

.



शक्‍य तितक्‍या लोकांना हे सांगा. त्यानं आपलं हृदयपरिवर्तन घडून येईल. कदाचित

इतरांचंही...



दुसरी मेणबत्ती लावण्यासाठी वापरल्याने पहिल्या मेणबत्तीचं काहीच कमी होत नाही.

नाही का?

Stumble Upon Toolbar

0 प्रतिक्रीया:

Related Posts with Thumbnails

Total Pageviews

Follow me on Blogarama
Netbhet.com  मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!
marathisuchi - free marathi link sharing website & marathi blogs aggregator
Blogvani.com
eXTReMe Tracker

  © Blogger template Inspiration by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP