-

ब्राम्हणांवर राग का??

>> Friday, November 7, 2008

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल गूगल वर सर्च करत होतो.खूप चांगल्या साइट्स बघायला मिळाल्या. गडांच्या,ट्रेकिंगच्या...छान वाटलं..
सर्फ़िंग करत असताना एक साइट सापडली...बय्राच जणांनी बघितलीही असेल पण मि पहिल्यांदाच पाहिली.

www.shivdharma.com

शिवधर्म!!
ब्राम्हणेतर लोकांचा धर्म...’इतर’ म्हणजे इतर सर्व...
श्री.बाळासाहेब मरळ या धर्माचे/संस्थेचे संचालक आहेत.
या धर्माचे स्वतहाचे संस्कार ,आरत्या आहेत..यातील आरत्या खूप चांगल्या व उत्तम अर्थ असलेल्या आहेत
त्या तुम्हाला साइट्वर पहायला मिळतिलच.

ब्राम्हणांवर या लोकांचा राग इतका का??
तर महराष्ट्र शासना तर्फ़े ’दादोजी कोंडदेव क्रीडा पुरस्कार’ दिला जातो.
तर दादोजी कोंडदेव हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू नव्हतेच अस त्यांचं म्हंटणं आहे..
ते महाराजांचे गुरू होते याचे पूरावे नाहीत असही ते म्हणतात.
समर्थ रामदास स्वामींबद्दलही त्यांचे हेच मत आहे.
संभाजी महाराजांनाही ’ब्रांम्हणानीच’ मारले असंही त्याचं मत आहे..

काय करणार ??काय वेळ आली आहे महाराष्ट्रात??
भारत चंद्रावर पोहोचला तरी आपण मी ब्रांम्हण तू मराठा अशा जाती भेदात अडकून पडणार आहोत का?
बेकारी , गरीबी , अशिक्षितता , अस्वच्छता अशा अनेक महत्वाच्या समस्या महराष्ट्रापूढे असताना असं भांडत बसून कसं चालेल?? आणि त्यातून काय सिद्ध होणार आहे??

दादोजी कोंडदेव , समर्थ रामदास छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू नसल्यास त्यांचे इतिहासातील महत्व कमी होत नाही...की त्यांची महानताही कमी होत नाही..
म्हणून त्यावरून आत्ता भांडत बसण्यात काय तठ्या आहे??

राजकारण्यांच्या अशा राजकारणात आपल्या सारखा सामान्य माणूस असा अडकायला लागला तर देशाच्या आणि महाराष्ट्रच्या प्रगती कडे कोणि पहायचं??
भारतातील सर्व जनता भारत एक महासता बनण्याची स्वप्न पहात असताना अशी फूट पाडण्याचा प्रयत्न करणे म्हणजे भारताला १० पाउले मागे घेउन जाण्यासारखे आहे..

महासत्ता बनण्यासाठी सर्वांनी मिळून, भेदभाव विसरून एक मेका साह्य करू आवघे धरू सुपंथ म्हणायचे की आपापसात भांडत बसून बाहेरच्या शत्रूंना अजून संधी द्यायच्या??

छत्रपती शिवाजी महाराज , बाबासाहेब आंबेडकर , महात्मा फुले या सारख्या महान लोकांनी सुशोभित असणाय्रा महराष्ट्राला हे अभिप्रेत आहे का?

Stumble Upon Toolbar

4 प्रतिक्रीया:

Sharvani Khare - Pethe November 7, 2008 at 11:37 PM  

एक चुक तुमच्या लेखात सापडली. Brahman हा शब्द ब्राह्मण असा लिहिला जत असून ब्राम्हण हे चुक आहे. BraHman असा शब्द आहे, BraMhan नाही.

cutehobit November 8, 2008 at 12:03 AM  

I know what you are telling.
I do Marathi typing in Baraha software.
So dont know how to type that word.
But I'll do the necessary correction.

डॉ.रूपेश श्रीवास्तव(Dr.Rupesh Shrivastava) November 8, 2008 at 3:02 AM  

ओंकार,तुला स्पषटीकरण द्यायची गरज नाहीच.... ही गोष्ट शब्दांची आहेच नाही;व्यर्थ सल्ला चा उपयोग का? लिहिलेला मजकूर काय ही वाचुन टिप्पणी करायला पाहिजे... खरा आहे न? मी पन बरहा वापरतो।
डा.रूपेश श्रीवास्तव

Sharvani Khare - Pethe November 8, 2008 at 10:23 PM  

I totally agree with what Dr. Shrivastava said. Its just that I myself m language student, so mistakes just happen to click me. M sorry!

Related Posts with Thumbnails

Total Pageviews

Follow me on Blogarama
Netbhet.com  मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!
marathisuchi - free marathi link sharing website & marathi blogs aggregator
Blogvani.com
eXTReMe Tracker

  © Blogger template Inspiration by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP