ताडोबा वाचावा..वाघ वाचवा...

>> Thursday, December 11, 2008

नमस्कार मित्रहो...
मागील आठवड्यात पुण्यातील बालगंधर्व रंगमंदीरमध्ये CMS Vatavan या संस्थेने Wildlife Film festival चे आयोजन केले होते.जागतीक पातळीवर प्रसिद्ध झालेल्या तसेच अनेक भारतीय निर्मात्यांच्या अनेक दर्जेदार फ़िल्म्स तिथे दाखवण्यात आल्या.
Global warming ,Shark ,cats यासारख्या अनेक विषयांवर बय्राच फ़िल्म्स होत्या.

अर्थात वाघावरही फ़िल्म होतीच....भारतातल्या वाघांच्या सध्य स्थितीवर एक छोटीशी Documentry दाखवण्यात आली.परंतू ती पाहील्यावर मन फार विषण्ण झालं...Project Tiger ची वाताहत,वाघांची कमी होणारी संख्या ,माणसांचे वाढणारे अतिक्रमण , सरकारची उदासीनता , वाढणारी तस्करी पाहून येणाय्रा भारताला " वाघ " दिसणार का? असा प्रश्न पडला.
वाघांच्या Documetry नंतर वन्यजीव संशोधक अमोल खेडगीकर यांनी ताडोबा "अभयाराण्याबद्दल" सांगीतलेल्या माहीतीने तर मती गूंग होण्याची वेळ आली. अमोल खेडगीकर ताडोबा मध्ये गेल्या ३ -४ वर्षापासून जंगलातच राहून अभ्यास करत आहेत.

तर ,त्यांनी काय सांगितले हे मी तूम्हाला थोडक्यात सांगतो..

महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये Tadoba Andhari Tiger Reserve(TATR) म्हणजेच ताडोबा राष्ट्रीय अभयारण्य आहे.वन्यजीव व वाघांच्या विपूल संख्येने सम्रूद्ध असा हा भाग आहे.आपल्यापैकी बय्राच जाणांनी हे जंगल आधी बघितलंही असेल पण जर आताच काही हालचाल केली नाही तर या सर्व मौल्यवान संपत्ती ला आपण हरवून बसू आणि वाघ भारतातून परीणामत: जगातून नष्ट होतील..

ताडोबा अभयारण्य ही भारतातील वाघांची देवराई आहे म्हणजेच Tiger Bank . इथे जन्म घेउन वाघ भारतातल्या वेगवेगळ्या जंगलांमध्ये पसरतात.या वेळचा सूगीच काळ तर इतका चांगला गेला आहे की आत ताडोब्या मध्ये २ वाघीणींनी छाव्यांना जन्म दिला आहे ! ताडोबा हे महाराष्ट्रातील वाघांसाठी एक आशेचा किरणच आहे.

प्रत्येक अभयारण्यामधे जंगलाच्या आतील बाजूस Core Area असतो..जेथे कोणत्याही वाहतूकीस किंवा पर्यटकांना बंदी असते.ह्या Core Area ला वन-रक्षक अगदी मूलाप्रमाणे जपतात . ताडोबाच्या Core Area च्या अगदी जवळच प्रचंड आकाराच्या कोळश्याच्या खाणीचा प्रस्ताव सरकार कडे सादर करण्यात आला आहे. अडानी पावर नावाच्या कंपनीला लोहारा गावाजवळ १८० हेक्टर वर खाणकाम करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. ह्या प्रकल्पा-अंतर्गत खाणीखाली जाणाय्रा जमीनीमध्ये जंगलाचा फार मोठा परीसर आहे जो की वाघांचा,दूर्मीळ वनस्पती आणि प्राण्यांनी भरलेला आहे. ह्या प्रकल्पामूळे प्रभावीत होणारे प्राणी भारत सरकरने संरक्षीत म्हणून आधी जाहीर केलेले आहेत. हे खाणीचं काम जर चालू झालं तर तिथे येणारी मोठी मोठी वहाने,माणसे ,प्रदूषण , कोलाहल यांनी जंगलातील प्राणी या पासून पळून जाण्याचा प्रयत्न करतील पण रहाण्यासठी दूसरी जागाच नसल्यामूळे प्राणाला मूकतील किंवा मग प्राणी मानवी वस्तीत घूसण्याच्या गटनात वाढ होइल.मग परत मनूष्य विरूद्ध प्राणी असा खेळ चालू होइल आणि अशा खेळत माणूसच नेहमी जिंकत आला आहे...दूर्दैवानी..


पर्यावरण आणि वन्यजीव या दोनच खात्यांशिवाय कामासाठी लागणाय्रा सर्व परवानग्या कंपनीने आधिच मिळवलेल्या आहेत आणि या परवानग्या कशा मिळतात हे आपल्या सगळ्यांना माहीत आहेच..उरलेल्या २ परवानग्या पूढील २ महीन्यात मिळण्याची शक्यता आहेत.म्हणूनच कंपनीला या सूंदर जंगला मध्ये खाणकाम करण्यास परवानगी मिळू नये व त्यांनी हा उद्योग दूसरीकडे हलवावा तद्नूसार निसर्गाला कमीत कमी हानी होइल म्हणून आपण या प्रकल्पाला जोरदार विरोध केला पाहीजे. आपला विरोध प्रकल्पाला नसून प्रकल्पाच्या जागेला आहे.

अशा कोळश्याच्या खणींमध्ये सूरूंगाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो ,सूरूंगाच्या स्फोटांमूळे ध्वनीपदूषण तर होतच शिवाय दूर्मीळ पक्षीही निघून जातात. मोठ्या मोठ्या खाणींमूळे भूअंतर्गत पाण्याच्या प्रावाहातही अडथळा निर्माण होतो, विहीरींचे पाणी आटते आणि शेतीवरही परीणाम होतो.
वाहानांमूळे होणारे प्रदूषण ते वेगळेच ह्या सगळ्या हालचालींचा परीणाम थेट जंगलावर , आपल्या सर्व प्राण्यांवर पडेल .

माहीतीच्या आधिकाराचा वापर करून आपल्याला याची पूर्ण माहीती मिळू शकते व आपण महराष्ट्रातील या बहूमोल संपत्तीला वाचवण्यासाठी ठोस पावलं उचलू शकतो. ताडोबाचं जंगल वाचवण्यासाठी आपण शक्य तो प्रयत्न करू. दूर्दैवाने बहूतांश जनतेला या प्रकारासंबंधी काहीच माहीती नाही.

वाघ वाचवण्यासाठी वन्यजीव प्रमींनी आधीच मोहीम उघडली आहे. जास्तीत जास्त जनता यात सामील व्हावे असे मी आव्हान करतो.

यावर नक्की विचार करा व तूमच्या प्रातीक्रीया मला कळवा.सध्या प्रकल्पावर Stay आणण्यासाठी वकीलांशी बोलणे चालू आहे.तूम्हालाही जर या मोहीमेत सहभागी व्यायचं असेल तर तूमचा E-mail ID मला पाठवा . पूढील हालचाली वैयक्तीकरीत्या मी मेल मधूनच कळवीन.

Stumble Upon Toolbar

1 प्रतिक्रीया:

Srushti Paryavaran July 30, 2009 at 5:17 AM  

आपण पण मदत करू शकता
www.savetadoba.org या संकेत स्थळवरुन
Online पेटिशन हा फॉर्म भरून आपण आपला कोळशाच्या खाणिला निषेध वक्त करू शकता

Related Posts with Thumbnails

Total Pageviews

eXTReMe Tracker

  © Blogger template Inspiration by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP