अप्रतीम प्रदर्शन
>> Monday, December 8, 2008
नमस्कार मित्रहो..
काल परवाच पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पेंटिग्ज चे प्रदर्शन भरविण्यात आल्याची बातमी पेपर मध्ये वाचली. आजच प्रदर्शन पाहून आलो.
FACT INDIA या संस्थेने या प्रदर्शनाचे आयोजन केलेलं आहे.
पुण्यातील घोले रोड वरील नवीनच तयार केलेल्या आर्ट गालरीमध्ये २० तारखेपर्यंत सकाळी १० ते ८ पर्यंत सर्वांसाठी मोफत खुले आहे.
राजस्थान मधील निष्णात कलाकारांनी महाराजांच्या जीवनातील प्रसंग अत्यंत सुंदर रीत्या रंगविलेली आहेत.
चित्रांमधील बारकावे अगदी अचूकपणे रंगवलेले आहेत. मोठ्या मोठ्या चित्रातील प्रत्येक व्यक्तीचे दाग दागीने , कापडे त्यावरील नक्षी सूद्धा त्यांनी खूप छान काढली आहे.
इतकी डीटेल चित्रे काढायला किती वेळ आणि किती कष्ट पडले असतील याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो.
महाराजांच्या आयुष्यातील महत्वाच्या गटना शक्य तितकी माहीती घेउन त्यांनी चितारले आहेत. चित्रांची तर प्रशंसा करावी तितकी कमीच. चित्राबरोबर राजपूतांची , मुघलांची महाराजांबद्दलची पत्र , लिखाणेही येथे मांडली आहेत शिवाय अ-मराठी नागरीकांसाठी English मध्ये महाराजांची माहीती लिहीलेली आहे.
सर्वात महत्वाचे म्हणजे ही सर्व चित्रे कोणत्याही मराठी माणसाने काढली नसून ती सर्व अ-मराठी आहेत ,FACT India मधीलही बरेच कर्मचारीही अ-मराठीच आहेत.
तिथे असलेल्या FACT INDIA च्या volunteer शी आम्ही थोद्यावेळ गप्पा मारल्या. विरू नाव त्यांचे. काही दिवसांपूर्वी ते माहीती घेण्यासाठी पुण्यात आले होते.त्यांना ती शोधताना फारच कष्ट पडले. महाराजांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत कोणत्याही घटनेमध्ये कोणाचेही एकमत नाही, हे पाहून त्यांना फार आश्चर्य वाटले आणि दू:खही..
त्यांचं बोलणं ऐकून मला फार वाइट वाटलं. महाराजांसारख्या अद्वितीय माणसाबद्दल इतकी कमी माहीती कशी हा प्रश्ण त्यांना होता..जो मलाही आहे.
महाराजांची माहीती जी महाराष्ट्राला माहीत आहे ती सर्व भारताला व जगाला कळावी यासाठी आपणच प्रयत्न केले पाहीजेत. Blog मधून, e-mail मधून त्याचा व्यवस्थीत प्रसार , प्रचार केला पाहीजे , भारतातल्या इतर राज्यांमधे महाराजांना पोचवले पाहीजे , नाहीतर अजून शे-दोनशे वर्षांनी महाराज कोण होते हेही माणसे विसरून जातील. त्यांचे कार्य ,कर्तूत्व,स्वराज्यासाठी केलेले प्रयत्न सर्व विस्म्रुतीत जातील.
या साठी आपण सर्व जण मिळून महाराजांना जिवंत ठेवण्याचे काम केलेच पाहीजे.
असो...
तर याचीच पहीली पायरी म्हणून सगळ्यांनी न विसरता वेळ काढून हे प्रदर्शन पहावे आणि त्याचा Blog विश्वात प्रसार करावा असा आग्रह मी धरतो..
1 प्रतिक्रीया:
He pradarshan jar mumabit bharanyachi baatami tumhala milali tar pls mail kara majhya id var.
Post a Comment