-

बळीचे बकरे आबा..

>> Monday, December 1, 2008

अतिरेकी येउन मेले आणि आपल्याकडे राजकारणी राजकारणच्या रंगपंचमीत रगून गेले.. कोणी कोणावर आरोप फेकतय तर कोणी कोणावर राजीनाम्याचा आदेश..सूपातल्या तांदळासारखे "भारतीय नागरीक" ही सगळी जत्रा मजेने ( रागाने??) बघत आहेत..दूसरं काय करणार? लहान मूलाला नवीन खेळणं दिलं की ते २ दिवस त्याच्या बरोबर खेळत बसतं , त्याप्रमाणे नवीन एखादी ब्रेकिंग न्यूज घडली की सगळे राजकारणी त्याच्यात खेळण्यात गूंग होतात...मग ते खेळणं आपल्याला मिळावं म्हणून एकमेकांत हाणामाय्रा करतात..

या सगळ्या खेळामध्ये एका बाळाची तर खूर्चीच कोणितरी पळवली..म्हणजे काढून घेतली...आपले आबा हो..त्यांची..
आबा बिचारे काय करणार ? काल राजीनामा विचारणाय्रांना नैतिकता विचारणारे आबा आज न काही बोलता व त्यांच्या खास शैलीत न्यूज चानेलला प्रतीक्रीया न देता आखाड्यातून ऊठून सरळ अंजणीला निघून गेले..
काय करणार High Command चा आदेश!! ते जे सांगतील ते करावच लागत...कारण त्यांच्यामूळेच तर खूर्ची मिळाली (गेलीपण) , ते सूद्धा पंतप्राधानांच्या खूर्चीकडे चातका सारखे डोळे लाऊन बसले आहेत..ते तरी काय करणार?? चार पायांची खूर्ची पण लाखो लोकांचे हात बांधून ठेवण्याची किमया तीला जमते..काय महीमा या खूर्चीचा??

गोळीवर गोळी मारणारे आबा मात्र आता खूर्चीवर नाहीत.."बडे शेहरोमे ऐसी घटनाए होती हें’ या आबांच्या वाक्याने त्यांचा घातच केला..तस काही म्हणायचं आबांच्या मनात नव्हतं ,पण ते आलं हो चूकून..
जीभच ती कूठेही पळते..म्हणून काय मेडीया वाल्यांनी त्याचा इतका बाऊ करावा? कित्ती विचार येत असतील आर .आर. च्या मनात!!

आबांचा कारभार तसा शिस्तीचा...त्यांच्या सदय्राप्रमाणे त्यांची प्रतीमा पूर्वीपासूनच स्वच्छ!
ग्राम विकसन मंत्रालयात असताना त्यांचे संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभीयान फार गाजले..त्यांनी ते गाजवले..ते इतके गाजल्यामूळे व त्यांचे इतके नाव झाल्यामूळे गटातली इतर मंडळी मात्र अस्वस्थ होती..मग लगेचच त्यांना उप-मूर्खमंत्री (sorry sorry ,मूख्यमंत्री) म्हणून बोहल्यावर चढवण्यात आलं.. त्यांनंतरही आबांनी बारबालांना घरी बसवून मेडीया व मतदारांकडून पाठ थोपवून घेतली.. सर्व सूरळीत चालू असताना ..राहूल राज आला ,बेस्ट मध्ये गोळी मारून गेला आणि आबांनी आपल्या स्वत:वर च ही गोळी मारून घेतली..विनाशकाले विपरीत बूद्धी म्हणतात ती ही!!

असो..माझ्यामते तरी...आबांची प्रतीक्रीया देण्याच्या घाइची सवय सोडली तर बाकी त्यांच्या कारभारात फार आक्षेप घेण्यासारखे काही नाही. पोलीसांना पण त्यांनी हवी ती सूट दीली होतीच...
त्यांनी ज्या धडाडीने काम केले ते भाजपाच्या वेळी मूंड्यांनीही केले नव्हते.. केवळ या घटनेवर प्रतीक्रीया व आम्हाला या देशाची किती काळजी आहे हे दाखवण्याच्या कोंग्रेस च्या केविलवाण्या प्रायत्नाच्या बळीचे बकरे आबा झाले आहेत..

स्वत:ला ’सूपर उप-मूख्यमंत्री’ म्हणवून घेणारे छोटे साहेब म्हणजे अजीत दादा आता या खूर्चीच्या मागे पळत होते आणि आहेतच..आता ते उप-मूख्यमंत्री झाले म्हणून ते फार काही दीवे लावणार आहेत अशातला भाग नाही..
पण आता कोणीतरी बासयलाच हवं ना? म्हणून ते बसणार..नाहीतर ते बसलेच नसते हो!!

असो..
तर अशा राजकारणाच्या रास्सीखेचीत महाराष्ट्र त्याच्या उज्वल भविष्याची स्वप्ने पहात आहेतच.. मतदार Vot Bank मध्ये अडकून पडला आहे..शहीदांची यादी वाढत आहे..पैश्यांची गंगा अहोरत्र वहात आहे.. माय भवानी अजून शांतच आहे आणि सह्याद्री मात्र कीव येउन हसत आहे..

Stumble Upon Toolbar

0 प्रतिक्रीया:

Related Posts with Thumbnails

Total Pageviews

Follow me on Blogarama
Netbhet.com  मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!
marathisuchi - free marathi link sharing website & marathi blogs aggregator
Blogvani.com
eXTReMe Tracker

  © Blogger template Inspiration by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP