-

मंदी ,माणूस आणि महाराज...

>> Tuesday, December 30, 2008


जगभर मंदीची लाट जोरदार वहात आहे.अजून वर्षभर तरी ती रहाणार असे आपले अर्थतज्ञ सांगत आहेत.सहाजीकच भारतालाही ती झळ पोचत आहेच.बऱ्याच जणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.व्यवसाय बंद पडत आहेत.महागाई वाढत आहे.अशा सर्व गोष्टींचा परीणाम शेवटी माणसाच्या मनावर होणारच.मग तो कुठेतरी आधार शोधू लागणार.दान धर्म ,बाबा,बूवा ,महाराज यांच्या कडे ओढला जाणार.तिथे गेल्यावर काळजीतून आपली मुक्तता होईल अशी त्याची भाबडी आशा असणार...

हल्ली बाबा ,महाराज, प.पू. यांचे मोठे मोठे पोस्टर्स,बॅनर्स यांनी भरून गेलेले बस स्टॉप्स , भिंती अगदी सहज पहायला मिळतात.सत्संग, महाशिबिर ,दर्शन सोहळांनी शहरातली मैदानं भरलेली असतात.त्या शिबिरात तुम्ही गेलात तर तुम्हाला मनशांती मिळेल ,मोक्ष मिळेल ,पैसा मिळेल असं वाट्टेल ते सांगितलं जातं. मंदीचा अडचणीचा काळ हा तर अशा लोकांना फूल प्रोफ़िट चा असतो.जितक्या अडचणी जास्त तितके त्यांचे गिऱ्हाईक जास्त!आडला नारायण गाढवाचे पाय धरी याप्रमाणे अडलेली लोकं या गाढवांचे पाय धरतात. महाराष्ट्रातील कितीतरी बाबा बुवा महाराजांनी ज्ञानेश्वरीवर बक्कळ पैसे कमावले आहेत.ज्ञानेश्वरांनी त्यांच्या पसायदानातही स्वत:चे नाव टाकले नाही पण हे so called महाराज आपले नाव खाली लावायला विसरत नाहीत.अगदी बडी बडी सुशिक्षित माणसेही त्यांच्या कडे अशी जातात यचं मला फ़ार आश्चर्य वाटतं.मग गावाकडची अशिक्षित लोकं जर एखाद्या भोंदू साधू कडे गेली तर त्यांना का नावं ठेवावीत??त्यांच्यात आणि तूमच्यात फरक काय??राजकारण्यांमध्ये अशा महाराजांच्या सत्काराची चढाओढ चालू असते.ते किती महान आहेत ,भगवान आहेत हे लोकांना पटवून पटवून संगीतलं जातं,TV channels वाले त्याला भरपूर प्रसिद्धी देतात.तो माणूस महाराज व्हायच्या आधीची history कोणिही तपासून पहात नाही.जर तपासून पाहिलं आणि काही झोल सापडला तर त्याचे आनूयायी ,चेले गोंधळ घालतात , बसेस फोडतात , बंद करतात.
१००००००००० लोकसंख्या असलेल्या भारतात किमार लाखावर बाबा बूवा असतील.सर्वात सोपा ,भरपूर पैसे ,प्रसिद्धी मिळतेच त्याचबरोबर पूढच्या ७ काय १४ पिढ्यांची सोय या धंद्यातून करता येते.सोबत दिमतीला free सेवक असतातच.

पण हे असच चालू रहाणार आहे का??भारत हा बाबा बूवा साधूंचाच देश असणारे का??
माझ्यामते तरी अशा भोंदूंना आपणच हाकलून लावलं पाहीजे.आपणच जर मनानी कणखर झालो,संकटाला सामोरं जाण्याची ताकद जर आपण आपल्यात निर्माण केली तर काय गरज आहे या बाबा,बूवांच्या कुबड्यांची??ज्ञानेश्वरी स्वत: वाचून स्वत: त्याचा अर्थ आपण लावू शकत नाही का??आपण स्वत: कसं जगावं हे आपण art of living मधून शिकण्याइतपत आपण विचारहीन झालो आहोत का?? जगायचं कसं हे सूद्धा दूसऱ्यानी सांगावं??प.पू.ंचा आशिर्वाद घेतल्यानी व्यवसायाय प्रगती होणार आहे का??बालाजीला या वर्षी जर २ रूपये दिले तर पूढच्या वर्षी तो तूम्हाला ४ रूपये द्यायची ऐपत देतो असं म्हणतात.जर देवही अशी लाच घेत असेल तर त्याला देव का म्हणावं??मग सरकारी कचेऱ्यांमधे लाच आधिकृत केली तर?ह्यात देवाचा काहीही दोष नसून मनूष्य-प्रौऋत्तीचा आहे.मनोभावे एखद्यानी कही मगितलं तर त्याला ते मिळणार का त्यासाठी १०० ची नोटं दानपेटीत टाकावीचं लागणार??

स्वत:वर विश्वास ठेवणं हा या सर्वांवरचा जालीम उपाय आहे......तो असेल तर तोम्हीच तुमचे देव असाल..अर्थात हे शेवटी माझं मत आहे....आणि भारतात लोकशाही आहे... :)

Read more...

स्वारी किल्ले प्रबळगड...Prabalgad

>> Saturday, December 20, 2008


प्रबळगड आणि डावीकडे कलावंतीण
नमस्कार मित्रहो..
मगच्या रविवार - सोमवारी मि व माझा मित्र मोनिश पनवेल जवळच्या प्रबळगडावर गेलो होतो.
दोघेच होतो त्यामुळे गाडीवरच निघालो.सोबत तंबू ,शिधा ,भांडी-कुंडी , झोपायचं सामान घेतलं.
सधारण तीन साडेतीन तासानी ठाकूरवाडी म्हणजे पायथ्याच्या गावात पोचलो.मुंबई अगदी या गावापर्यंत येउन पोचली आहे. भल्या मोठ्या बंगल्यांच्या स्कीम्स , रेसोर्ट्स मुळे गावाला थोड्याच वर्षात शहरी लूक येइल हे नक्की.प्रबळगडजवळ कलावंतीण नावाचा सूळका आहे.बहूतेक ट्रेकर्स मध्ये गडापेक्षा हा सूळका त्याच्या दगडात कोरलेल्या पायय्रांमुळे प्रसिद्ध आहे.एक दीड तासाच्या पायपीटीनंतर आपण माचीवर पोचतो.पसारा ,उंची आणि कोकणातलं दमट हवामानमुळे प्रबळगडानी माझी तर पूरती हवा काढली.
गडाच्या माचीवर प्रबळगडमाची नावाचं १०-२० घरांचं गाव आहे.पूण्यापेक्षा मुंबईला हा गड जवळ असल्यामुळे तिथली लोकं जास्त भेटं देतात.
शिधा बरोबर नेला नसल्यास आगाऊ संगितलं तर या गावातली लोकं सूद्धा जेवणाची व्यवस्था करतात.फ़क्त अगदी पंचपक्वांनाची अपेक्षा करू नये.जेवाण झाल्यानंतर त्यांना पूरेसा मोबदला द्यावा.परंतू उगाच जास्त पैसे देउ नयेत.नाहीतर ते ताडी पिउन उडवतात.आम्हाला भेटलेले १,२ सोडले तर सगळे फ़ूल टल्लीच होते.
दूपारी पोचल्यावर कलावंतीणीवर चढायला सुरवात केली.चार साडेचार ला वरती पोचलो.
अंधार पडायच्या आत फोटो काढून घेतले. प्रबळगडच्या माहीतीचा छोटा विडीओ घेतला.जातानाच चूलीसाठी वळलेली लाकडं घेउन वर गेलो.पोचलो तेव्हा वारा पडला होता. थोडा वेळ विश्रांती घेउन मॅगी करायला घेतली.अग्नीदेव फारच लवकर प्रसन्न झाल्यामुळे पोटपूजा लवकर संपली.
तंबू टाकून मुंबईला जाणाय्रा विमानांकडे पाहात बसलो ,गप्पांनंतर झोपलो.तंबू कड्यापासून १ फ़ूटावरचं होता कारण दूसरी सपाट जागाच नव्हती. कडा पण चांगला एक दीड हजार फ़ुट होता.रात्री झोपताना वारा अगदी शून्य होता. कशाला स्वेटर आणले असं वाटल.आभाळ आल्यामूळे जास्तच गरम होत होतं.तंबूच्या जाळीतून ढगांच्या मागून पळणाय्रा चंद्राला बघत झोप लागली.पण रात्री असा काही वारा सूटला की काय सांगायचं. तंबू वाकून अगदी चेहय्राला टेकत होता.दार वाय्रावर फ़डा फ़डा वाजत होतं.मधेच बाहेर राहीलेली बाटली गडगडत गेल्याचा आवाज आला.आम्ही दोघे कुंभकर्ण तसेच दडपुन झोपुन राहीलो.६ ला पुढे चालू लागायचं असं झोपताना ठरवून साडेआठला उठलो.वारा पळत होताच.शेवटी मी उठलो.चेन उघडून बाहेर डोकं काढलं.सूर्य अजून ढगातच होत.मोन्याला म्हणजे मोनिश ला हलवून मि बाहेर पाउल टाकून बूट घालत होतो तेव्हड्यात जोरात वारा आला आणि तंबू मोन्याला घेउन कड्याकडे सरकला. उडी मारून तंबू धरला ,मोन्यापण धक्क्यानं जागा झाला आणि बाहेर येउन बसला.तो बाहेर आल्यावर तर तंबू अजून जोरात हालू लागला.तसचं त्याला गूंडाळलं आणि सामान आवरलं.

निवांत उठून परत तोच मॅगी चा नाश्ता केला.काल येताना एका ठाकराने वरती पाण्याचे टाकं असल्याचं सांगीतलं होतं , पाण्याची एकचं बाटली शिल्लक होती म्हणून टाकं शोधायचं ठरवलं . तूम्हाला जमणार नाही अस त्यानी आम्हाला सांगीतलं होतं.पण आमच्या अंगात कीडे आणि अडवायला ही कोणि नसल्यामुळे टाकं शोध सुरू केला.सूळक्याच्या उत्तरेला वाट खाली खिंडीत उतरत होती.मधे-मधे पायय्रा खोदलेल्या होत्या.
पण रेती आणि गवतामुळे वाट निसरडी झाली होती.खाली घसरलो तर सरळ यमाकडे पोच पावती मिळायची.
तसेच कड्यवरून खंद्यावर पाय ठेवत उतरून खिंडीत आलो.दोन्ही बाजूला खोल दरी होती ,दरीत जंगल आणि पायाखाली घसरडी माती.खिंड अगदी ताशीव आहे,टाकीचे घाव कातळावर दिसतात.तिथे उतरल्यावर डाव्या बाजूल खाली सधारण अडीच बाय अडीच फूटची गूहा दिसली.वाकून बघितल्यावर गूहा बरीच खोल असल्याची जाणीव झाली.आत काळाकुट्ट आंधार होता.मोन्यानी दोन चार दगड आत टाकून बघून आत काही आहे का ते बघितल. थोडा विचार करून आत जाउया असं ठरलं,टॉर्च नव्हताच मग मोन्यानी त्याचा मोबाइल काढला.त्याच्या अंधूक प्रकाशा गूढग्यावर रांगत आत शिरलो.आत कूबट वास पसरला होता.पण तो वट्वाघळांचा नव्हाता.रांगत रांगत १०’ आत गेलो वाट डावीकडे जाउन परत उजवीकडे वळली होती.पुढे जाउच असं ठरवून परत आत सरकलो.पुढे पाहतो तर वाट परत डावीकडे वळली होती.अंधार,वास आणि थोडी भिती मुळे जोरदार घाम फूटला होता.डवीकडे ,उजवीकडे करत २५’-३०’ आत आलो होतो.सुदैवाने आत काही हालचाल जाणवत नव्हती.तसेच पुढे सरकलो ,वाट काहीशी संपल्यासारखी वाटली.खालचे खडे गुढग्याला टोचत होते.वाट संपली, मोबाईलच्या प्रकाशात आत बघितले तर चांगली २५’लांब १५’ रुंद ४’उंच दगडात कोरलेली खोली होती. चारही बाजूला क्षारांचे पंढरे ओहोळ दिसत होते.कोपय्रात थोडी लाकडं जमा केलेली दिसली.थोडा वेळ थांबून चारही बाजूला काय काय आहे ते पाहीलं आतपर्यंत हवा पोचत नसल्यमुळे घुसमट होत होती.घामानी अंग भिजलं होतं.गुहेत कोंडल्यासारख वाटत होतं मग लगेच रांगत बाहेर पडलो.बाहेर आल्यावर एकदम भारी वाटलं,मोकळ्या हवेच महत्व पटलं.
गुहेच्या बाहेर परत वाटेवर आलो.पुढे वाट टाक्याकडे जात होती.डावीकडे वळून कड्याला चिकटून गवत पायात दाबत पुढे चालू लागलो.खाली खोलवर प्रबळगड्माची गाव दिसत होतं,गावतून येणारे आवाज दरीमध्ये घूमत होते.३०,४० पावलं पुढे गेल्यावर टाकं लागलं पाणी एकदम हिरवगार ,शेवाळ्यान भरलेलं निवळीचे किडे मधेमधे फ़िरत होते.कड्याच्या इतक्या कडेला टाकं कसं खोदलं असेल यचं आश्चर्य वाटत होतं. १० १५ मिनीट बसलो.बय्राच वेळानी सावली मिळाली.
टाक्यापर्यंत आलेली वाट पुढे दरीकडे कातळाला चिकटून उतरत होती.मोन्या म्हणाल मी २ मिनिटात बघून येतो.तो गेला आणि मी खालच्या दरीतलं जंगल बघत बसलो.धनगर आणि त्याची जनावरं बारीक ठिपक्यासारखी दिसत होती. तो बहुधा मला हात दाखवत होता.काही कळत नव्हतं.१० १५ मिनिट झाली मोन्या परत आलाच नाही.मग हाका मारायला सुरूवात केली.दरीतून आवाज घुमून परत मलाच ऐकू येत होता.पण मोन्याच्या काही रीप्ल्याय नाही.५-१० मिनिटं गेली. हाका चालूच होत्या.मग मी पण ती वाट उतरू लागलो. पहिल्यांदा दगडातल्या काही २’-२.५’ पायय्रा लागल्या. वाट कड्याला चिकटून गोल फिरत पुढे जात होती.मोन्याचा पत्ताच नव्हता शेवटी मी खाली दरीत कुठे दिसतोय ते बघयला लागलो.धनगर माझ्याकडे बघत उभा होता.मधेच हात हलवत होता.वाट हळूहळू लहान लहान होत होती.दगडं संपून गवत चालू झालं.दोन्ही हातांनी डावीकडच्या कातळाला धरून मी पुढे जात होतो.वाट इतकी लहान झाली होती की पावलं शेजारी शेजारी मावत नव्हती.खाली तर दरी होतीच.आता मी मोन्याला हाका मारणं पण बंद केलं.फक्त खाली दरीत बघत होतो.पण जंगलाशिवाय काहीच दिसत नव्हत.आतापर्यंत बराच पुढे आलो होतो.
सूळक्याला जवळजवळ पाउण प्रदक्षीणा झाली होती आणि वाटचं संपली. मागे फिरण्याचा प्रश्नच नव्हता.इकडे तिकडे बघितलं , हात जिथ टेकला होता तीच खोबण होती तीच्या वरती अजुन एक अशा वरती जाणाय्रा दगडातल्या पायय्रा दिसल्या.जेमतेम आपला चवडा मावेल इतक्या. एक एक पायरी वरती चढू लागलो.मध्येच वाय्रानी तोल जात होता.डोळ्यात धूळ भरत होती.चढत चढत १५ ’-२०’ वरती आलो आणि पुढच्या पायय्राच दिसेनात.गवतात सगळ गडप झालं होतं. जास्त पाय ताणला असता तर पायात गोळे येतात म्हणून तेही करत नव्हतो , पायात गोळा आल तर थेट खालीच.पाच दहा मिनिट तसाच एका जागी थांबलो.घामानी अंग भिजलं होतं आणि भितीनं पाय लटपटत होते.दोन्ही हात दगडाच्या फटीत घातले होते.उजवीकडे थोद्या लांब एक दगड होता,त्यावर गवत माजलं होतं.पाय थोडा ताणून तिथं टेकवला.स्थिर झालो.
उजव्या बाजूला आधार शोधत होतो तितल्यात पायाखालचा दगड खाली सरकला ,हाताला धरायला काहीच मिळालं नाही आणि दगडावर घासत ५-६ इंच खाली घसरलो.पण त्या छोट्या अंतरानी अगदी ब्रंम्हांड आठवलं , अगदी कपाळात जायची वेळ आली.एका क्षणात आयुष्याचा फ़्लॅशबॅक डोळ्यासमोरुन गेला.आइ बाबांची अगदी मनापासून आठवण आली.उद्याच्या पेपरामधली ’तरूण बेपत्ता’ची बातमी दिसू लागली.खाली पडलो तर तुकडे गोळा करायला NGS Commandosना बोलवायला लागलं असतं.तेही मिळाले असते का यात शंकाच आहे. मोन्याची काळजी होती.दोन मिनिट जागीच तडफडत पोटावर भार देउन उभा होतो.पायाखाली आधाराला काही नव्हतच.हाताला आधाराला थोडी जागा मिळाली.चित्रगुप्त माझ्या वहीत समाप्त असं लिहिणार तेव्हड्यात वरून मोनिश ची हाक ऐकू आली.मोन्या वरती १०’ वर उभा होता.हातात छोटी दोरी होती.मोन्याला बघितल्यावर एकदम जिवात जीव आला आणि परत त्याच दगडावर पाय देउन वरती सरकलो.थोडी सपाट आडवी जागा मिळाली.मोन्याच्या चेहय्रावर पण मी दिसल्याचं समाधान दिसत होतं.वरती जाउन कड्याला टेकून उभा राहीलो.पण वरती पायय्रा नव्हत्या.डावीकडे वाटच नव्हती.उजवीकडे नशीबानी पायवाट दिसली,१५ २० पावलं चालल्यानंतर सूकलेलं टाकं लागलं.चित्रगुप्तानं पेन खाली ठेउन वही मिटली.
मोन्या उतरून खाली आला होता.मग तिकडून पुढे मूख्य पायवाटेला लागलो.मागे वळून परत एकदा कड्याकडे बघितलं आणि मावळ्यानी आशा कड्यावर पायय्रा कशा खोदल्या आसतील असा विचार केला.१० १५ मिनिट दगडावर बसलो.पाय अजूनही हालत होते.मोन्याही त्याच वाटेनं वरती आला होता आणि त्याचीही परिस्थिती माझ्यासारखीच झाली होती.त्याचाही घसा हाका मारून कोरडा झाला होता.पण दोघांनाही कशा ऐकू आल्या नाहीत याचं खूप आश्चर्य वाटलं.मग दोघही माझी कशी फाटली हे दोघांना सांगू लागलो.त्याला पण मी कदाचीत खाली गेलो असं वाटून तो दोरी वगरे घेउन निघाला होता.मग परत पायवाटेनं सूळक्याच्या वरती गेलो.सामान तिथेच पडलं होतं.१५ मिनिट बसलो,एकमेकांचे किस्से ऐकले आणि खाली गावात निघालो.वेळ नसल्यामुळे गडावार जाण्याचं कॅन्सल केलं.

कलवंतीण आमच्याकडे बघून हसत असल्याचा भास होत होता.म्रूत्यूच भय काय असत ते जाणवलं.गावात थोडा वेळ थांबून कोरा चहा घेउन थेट खाली वडापाशी पोचलो.गाडीवर टांग मारून पूण्याकडे निघालो पण मनातून मात्र त्या कड्यावर तसाच लटकत होतो.....

प्रबळगडावरून कलावंतीण


प्रबळगडचा कडा


तंबूची जागा


प्रबळगड माची गाव


Read more...

ताडोबा वाचावा..वाघ वाचवा...

>> Thursday, December 11, 2008

नमस्कार मित्रहो...
मागील आठवड्यात पुण्यातील बालगंधर्व रंगमंदीरमध्ये CMS Vatavan या संस्थेने Wildlife Film festival चे आयोजन केले होते.जागतीक पातळीवर प्रसिद्ध झालेल्या तसेच अनेक भारतीय निर्मात्यांच्या अनेक दर्जेदार फ़िल्म्स तिथे दाखवण्यात आल्या.
Global warming ,Shark ,cats यासारख्या अनेक विषयांवर बय्राच फ़िल्म्स होत्या.

अर्थात वाघावरही फ़िल्म होतीच....भारतातल्या वाघांच्या सध्य स्थितीवर एक छोटीशी Documentry दाखवण्यात आली.परंतू ती पाहील्यावर मन फार विषण्ण झालं...Project Tiger ची वाताहत,वाघांची कमी होणारी संख्या ,माणसांचे वाढणारे अतिक्रमण , सरकारची उदासीनता , वाढणारी तस्करी पाहून येणाय्रा भारताला " वाघ " दिसणार का? असा प्रश्न पडला.
वाघांच्या Documetry नंतर वन्यजीव संशोधक अमोल खेडगीकर यांनी ताडोबा "अभयाराण्याबद्दल" सांगीतलेल्या माहीतीने तर मती गूंग होण्याची वेळ आली. अमोल खेडगीकर ताडोबा मध्ये गेल्या ३ -४ वर्षापासून जंगलातच राहून अभ्यास करत आहेत.

तर ,त्यांनी काय सांगितले हे मी तूम्हाला थोडक्यात सांगतो..

महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये Tadoba Andhari Tiger Reserve(TATR) म्हणजेच ताडोबा राष्ट्रीय अभयारण्य आहे.वन्यजीव व वाघांच्या विपूल संख्येने सम्रूद्ध असा हा भाग आहे.आपल्यापैकी बय्राच जाणांनी हे जंगल आधी बघितलंही असेल पण जर आताच काही हालचाल केली नाही तर या सर्व मौल्यवान संपत्ती ला आपण हरवून बसू आणि वाघ भारतातून परीणामत: जगातून नष्ट होतील..

ताडोबा अभयारण्य ही भारतातील वाघांची देवराई आहे म्हणजेच Tiger Bank . इथे जन्म घेउन वाघ भारतातल्या वेगवेगळ्या जंगलांमध्ये पसरतात.या वेळचा सूगीच काळ तर इतका चांगला गेला आहे की आत ताडोब्या मध्ये २ वाघीणींनी छाव्यांना जन्म दिला आहे ! ताडोबा हे महाराष्ट्रातील वाघांसाठी एक आशेचा किरणच आहे.

प्रत्येक अभयारण्यामधे जंगलाच्या आतील बाजूस Core Area असतो..जेथे कोणत्याही वाहतूकीस किंवा पर्यटकांना बंदी असते.ह्या Core Area ला वन-रक्षक अगदी मूलाप्रमाणे जपतात . ताडोबाच्या Core Area च्या अगदी जवळच प्रचंड आकाराच्या कोळश्याच्या खाणीचा प्रस्ताव सरकार कडे सादर करण्यात आला आहे. अडानी पावर नावाच्या कंपनीला लोहारा गावाजवळ १८० हेक्टर वर खाणकाम करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. ह्या प्रकल्पा-अंतर्गत खाणीखाली जाणाय्रा जमीनीमध्ये जंगलाचा फार मोठा परीसर आहे जो की वाघांचा,दूर्मीळ वनस्पती आणि प्राण्यांनी भरलेला आहे. ह्या प्रकल्पामूळे प्रभावीत होणारे प्राणी भारत सरकरने संरक्षीत म्हणून आधी जाहीर केलेले आहेत. हे खाणीचं काम जर चालू झालं तर तिथे येणारी मोठी मोठी वहाने,माणसे ,प्रदूषण , कोलाहल यांनी जंगलातील प्राणी या पासून पळून जाण्याचा प्रयत्न करतील पण रहाण्यासठी दूसरी जागाच नसल्यामूळे प्राणाला मूकतील किंवा मग प्राणी मानवी वस्तीत घूसण्याच्या गटनात वाढ होइल.मग परत मनूष्य विरूद्ध प्राणी असा खेळ चालू होइल आणि अशा खेळत माणूसच नेहमी जिंकत आला आहे...दूर्दैवानी..


पर्यावरण आणि वन्यजीव या दोनच खात्यांशिवाय कामासाठी लागणाय्रा सर्व परवानग्या कंपनीने आधिच मिळवलेल्या आहेत आणि या परवानग्या कशा मिळतात हे आपल्या सगळ्यांना माहीत आहेच..उरलेल्या २ परवानग्या पूढील २ महीन्यात मिळण्याची शक्यता आहेत.म्हणूनच कंपनीला या सूंदर जंगला मध्ये खाणकाम करण्यास परवानगी मिळू नये व त्यांनी हा उद्योग दूसरीकडे हलवावा तद्नूसार निसर्गाला कमीत कमी हानी होइल म्हणून आपण या प्रकल्पाला जोरदार विरोध केला पाहीजे. आपला विरोध प्रकल्पाला नसून प्रकल्पाच्या जागेला आहे.

अशा कोळश्याच्या खणींमध्ये सूरूंगाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो ,सूरूंगाच्या स्फोटांमूळे ध्वनीपदूषण तर होतच शिवाय दूर्मीळ पक्षीही निघून जातात. मोठ्या मोठ्या खाणींमूळे भूअंतर्गत पाण्याच्या प्रावाहातही अडथळा निर्माण होतो, विहीरींचे पाणी आटते आणि शेतीवरही परीणाम होतो.
वाहानांमूळे होणारे प्रदूषण ते वेगळेच ह्या सगळ्या हालचालींचा परीणाम थेट जंगलावर , आपल्या सर्व प्राण्यांवर पडेल .

माहीतीच्या आधिकाराचा वापर करून आपल्याला याची पूर्ण माहीती मिळू शकते व आपण महराष्ट्रातील या बहूमोल संपत्तीला वाचवण्यासाठी ठोस पावलं उचलू शकतो. ताडोबाचं जंगल वाचवण्यासाठी आपण शक्य तो प्रयत्न करू. दूर्दैवाने बहूतांश जनतेला या प्रकारासंबंधी काहीच माहीती नाही.

वाघ वाचवण्यासाठी वन्यजीव प्रमींनी आधीच मोहीम उघडली आहे. जास्तीत जास्त जनता यात सामील व्हावे असे मी आव्हान करतो.

यावर नक्की विचार करा व तूमच्या प्रातीक्रीया मला कळवा.सध्या प्रकल्पावर Stay आणण्यासाठी वकीलांशी बोलणे चालू आहे.तूम्हालाही जर या मोहीमेत सहभागी व्यायचं असेल तर तूमचा E-mail ID मला पाठवा . पूढील हालचाली वैयक्तीकरीत्या मी मेल मधूनच कळवीन.

Read more...

अप्रतीम प्रदर्शन

>> Monday, December 8, 2008

नमस्कार मित्रहो..
काल परवाच पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पेंटिग्ज चे प्रदर्शन भरविण्यात आल्याची बातमी पेपर मध्ये वाचली. आजच प्रदर्शन पाहून आलो.
FACT INDIA या संस्थेने या प्रदर्शनाचे आयोजन केलेलं आहे.
पुण्यातील घोले रोड वरील नवीनच तयार केलेल्या आर्ट गालरीमध्ये २० तारखेपर्यंत सकाळी १० ते ८ पर्यंत सर्वांसाठी मोफत खुले आहे.
राजस्थान मधील निष्णात कलाकारांनी महाराजांच्या जीवनातील प्रसंग अत्यंत सुंदर रीत्या रंगविलेली आहेत.
चित्रांमधील बारकावे अगदी अचूकपणे रंगवलेले आहेत. मोठ्या मोठ्या चित्रातील प्रत्येक व्यक्तीचे दाग दागीने , कापडे त्यावरील नक्षी सूद्धा त्यांनी खूप छान काढली आहे.
इतकी डीटेल चित्रे काढायला किती वेळ आणि किती कष्ट पडले असतील याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो.
महाराजांच्या आयुष्यातील महत्वाच्या गटना शक्य तितकी माहीती घेउन त्यांनी चितारले आहेत. चित्रांची तर प्रशंसा करावी तितकी कमीच. चित्राबरोबर राजपूतांची , मुघलांची महाराजांबद्दलची पत्र , लिखाणेही येथे मांडली आहेत शिवाय अ-मराठी नागरीकांसाठी English मध्ये महाराजांची माहीती लिहीलेली आहे.
सर्वात महत्वाचे म्हणजे ही सर्व चित्रे कोणत्याही मराठी माणसाने काढली नसून ती सर्व अ-मराठी आहेत ,FACT India मधीलही बरेच कर्मचारीही अ-मराठीच आहेत.
तिथे असलेल्या FACT INDIA च्या volunteer शी आम्ही थोद्यावेळ गप्पा मारल्या. विरू नाव त्यांचे. काही दिवसांपूर्वी ते माहीती घेण्यासाठी पुण्यात आले होते.त्यांना ती शोधताना फारच कष्ट पडले. महाराजांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत कोणत्याही घटनेमध्ये कोणाचेही एकमत नाही, हे पाहून त्यांना फार आश्चर्य वाटले आणि दू:खही..
त्यांचं बोलणं ऐकून मला फार वाइट वाटलं. महाराजांसारख्या अद्वितीय माणसाबद्दल इतकी कमी माहीती कशी हा प्रश्ण त्यांना होता..जो मलाही आहे.
महाराजांची माहीती जी महाराष्ट्राला माहीत आहे ती सर्व भारताला व जगाला कळावी यासाठी आपणच प्रयत्न केले पाहीजेत. Blog मधून, e-mail मधून त्याचा व्यवस्थीत प्रसार , प्रचार केला पाहीजे , भारतातल्या इतर राज्यांमधे महाराजांना पोचवले पाहीजे , नाहीतर अजून शे-दोनशे वर्षांनी महाराज कोण होते हेही माणसे विसरून जातील. त्यांचे कार्य ,कर्तूत्व,स्वराज्यासाठी केलेले प्रयत्न सर्व विस्म्रुतीत जातील.
या साठी आपण सर्व जण मिळून महाराजांना जिवंत ठेवण्याचे काम केलेच पाहीजे.
असो...
तर याचीच पहीली पायरी म्हणून सगळ्यांनी न विसरता वेळ काढून हे प्रदर्शन पहावे आणि त्याचा Blog विश्वात प्रसार करावा असा आग्रह मी धरतो..

Read more...

बळीचे बकरे आबा..

>> Monday, December 1, 2008

अतिरेकी येउन मेले आणि आपल्याकडे राजकारणी राजकारणच्या रंगपंचमीत रगून गेले.. कोणी कोणावर आरोप फेकतय तर कोणी कोणावर राजीनाम्याचा आदेश..सूपातल्या तांदळासारखे "भारतीय नागरीक" ही सगळी जत्रा मजेने ( रागाने??) बघत आहेत..दूसरं काय करणार? लहान मूलाला नवीन खेळणं दिलं की ते २ दिवस त्याच्या बरोबर खेळत बसतं , त्याप्रमाणे नवीन एखादी ब्रेकिंग न्यूज घडली की सगळे राजकारणी त्याच्यात खेळण्यात गूंग होतात...मग ते खेळणं आपल्याला मिळावं म्हणून एकमेकांत हाणामाय्रा करतात..

या सगळ्या खेळामध्ये एका बाळाची तर खूर्चीच कोणितरी पळवली..म्हणजे काढून घेतली...आपले आबा हो..त्यांची..
आबा बिचारे काय करणार ? काल राजीनामा विचारणाय्रांना नैतिकता विचारणारे आबा आज न काही बोलता व त्यांच्या खास शैलीत न्यूज चानेलला प्रतीक्रीया न देता आखाड्यातून ऊठून सरळ अंजणीला निघून गेले..
काय करणार High Command चा आदेश!! ते जे सांगतील ते करावच लागत...कारण त्यांच्यामूळेच तर खूर्ची मिळाली (गेलीपण) , ते सूद्धा पंतप्राधानांच्या खूर्चीकडे चातका सारखे डोळे लाऊन बसले आहेत..ते तरी काय करणार?? चार पायांची खूर्ची पण लाखो लोकांचे हात बांधून ठेवण्याची किमया तीला जमते..काय महीमा या खूर्चीचा??

गोळीवर गोळी मारणारे आबा मात्र आता खूर्चीवर नाहीत.."बडे शेहरोमे ऐसी घटनाए होती हें’ या आबांच्या वाक्याने त्यांचा घातच केला..तस काही म्हणायचं आबांच्या मनात नव्हतं ,पण ते आलं हो चूकून..
जीभच ती कूठेही पळते..म्हणून काय मेडीया वाल्यांनी त्याचा इतका बाऊ करावा? कित्ती विचार येत असतील आर .आर. च्या मनात!!

आबांचा कारभार तसा शिस्तीचा...त्यांच्या सदय्राप्रमाणे त्यांची प्रतीमा पूर्वीपासूनच स्वच्छ!
ग्राम विकसन मंत्रालयात असताना त्यांचे संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभीयान फार गाजले..त्यांनी ते गाजवले..ते इतके गाजल्यामूळे व त्यांचे इतके नाव झाल्यामूळे गटातली इतर मंडळी मात्र अस्वस्थ होती..मग लगेचच त्यांना उप-मूर्खमंत्री (sorry sorry ,मूख्यमंत्री) म्हणून बोहल्यावर चढवण्यात आलं.. त्यांनंतरही आबांनी बारबालांना घरी बसवून मेडीया व मतदारांकडून पाठ थोपवून घेतली.. सर्व सूरळीत चालू असताना ..राहूल राज आला ,बेस्ट मध्ये गोळी मारून गेला आणि आबांनी आपल्या स्वत:वर च ही गोळी मारून घेतली..विनाशकाले विपरीत बूद्धी म्हणतात ती ही!!

असो..माझ्यामते तरी...आबांची प्रतीक्रीया देण्याच्या घाइची सवय सोडली तर बाकी त्यांच्या कारभारात फार आक्षेप घेण्यासारखे काही नाही. पोलीसांना पण त्यांनी हवी ती सूट दीली होतीच...
त्यांनी ज्या धडाडीने काम केले ते भाजपाच्या वेळी मूंड्यांनीही केले नव्हते.. केवळ या घटनेवर प्रतीक्रीया व आम्हाला या देशाची किती काळजी आहे हे दाखवण्याच्या कोंग्रेस च्या केविलवाण्या प्रायत्नाच्या बळीचे बकरे आबा झाले आहेत..

स्वत:ला ’सूपर उप-मूख्यमंत्री’ म्हणवून घेणारे छोटे साहेब म्हणजे अजीत दादा आता या खूर्चीच्या मागे पळत होते आणि आहेतच..आता ते उप-मूख्यमंत्री झाले म्हणून ते फार काही दीवे लावणार आहेत अशातला भाग नाही..
पण आता कोणीतरी बासयलाच हवं ना? म्हणून ते बसणार..नाहीतर ते बसलेच नसते हो!!

असो..
तर अशा राजकारणाच्या रास्सीखेचीत महाराष्ट्र त्याच्या उज्वल भविष्याची स्वप्ने पहात आहेतच.. मतदार Vot Bank मध्ये अडकून पडला आहे..शहीदांची यादी वाढत आहे..पैश्यांची गंगा अहोरत्र वहात आहे.. माय भवानी अजून शांतच आहे आणि सह्याद्री मात्र कीव येउन हसत आहे..

Read more...

हल्ला आणि राजकारण

>> Saturday, November 29, 2008


अखेर दहशद वादींचा आपल्या शूर NSG Commondo नी नायनाट करून टाकला.
परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे हे पोलिसांच्या लगेच लक्षात आले हे एक बरे झाले.. Army चे लोक शांतपणे आले आपलं काम केलं आणि शांतपणे निघून गेले..कुठेही गजावजा नाही कुठेही प्रसिद्धी नाही..
टीव्ही वर जेव्हा हे बघत होतो तेव्हा दिसत होत की या NSG commondos चे हेल्मेट किती साधारण दर्जाचे आहेत..आपण दूचकी वर घालतो त्यासारखी हेल्मेट ते अतीरेक्यांशी लढताना वापरत होते...
शहीद हेमंत करकरे यांनाही डोक्यात गोळी लागली ती हेल्मेट च्या आरपार जाउन..स्वत:च्या जीवावर उदार होण्यार्या अशा जवानांसाठी अशा हलक्या प्रकारची समूग्री का???
राहून राहून या गोष्टीचं फार वाइट वाटत आहे आणि रागही येत आहे..
दिल्ली मध्ये AC त बसण्याय्रा राजकारण्यांना आपली खूर्ची सोडून दूसरीकडे लक्ष्य द्यायला वेळ मिळतो का??
या घटनेचा आता निवडणूकीत कसा वापर करायचा या बद्दल लगेच राजकारण्यांमध्ये चर्चा चालू झाली...भाजपा असो, कोंग्रेस असो अथवा अजून कोणी पवार ,पाटील असो..सर्व तसेच...

या वेळी मात्र मीडीया खूप जबाबदारीने वागताना दिसून आली. कूठेही भडकऊ अथवा एखाद्या समाजाला लक्ष करून breaking news आल्या नाहीत.
सर्व चानेल चे Reporters रात्रंदिवस तेथे हजर राहून बातम्या पूरवीत होते..
त्यामूळे प्रत्येक घटनेचा तपशील लगेच कळत होता..

या घटनेनंतर तरी आपल्या सरकारने खडबडून जागे व्हावे आणि आपल्या सैनिकांना अधिक सक्षम करावे.
ही आपल्या सर्व नागरीकांची जबाबदारी आहे की आपण शक्य ती मदत पोलिसांना केलीच पहीजे..

या घटनेचा वापर आता राजकारणी आपल्या खूर्चीच्या राजकारणात करू नये एवडीच अपेक्षा....

Read more...

रामनाथ ची पुणेरी पाटी...

>> Tuesday, November 25, 2008

तर मित्रहो ही आहे पुण्यातल्या टिळक रोड वरील रामनाथ होटेल ची पाटी...
रामनाथ ची चटकदार मिसळ फ़ार प्रसिद्ध आहे बरंका...



आहे कि नाई चटकदार पाटी?
होटेल तसं लहानच आहे पण पुणेकरांना चांगल्या चवीशी कारण असते..

Read more...

ब्राम्हणांवर राग का??

>> Friday, November 7, 2008

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल गूगल वर सर्च करत होतो.खूप चांगल्या साइट्स बघायला मिळाल्या. गडांच्या,ट्रेकिंगच्या...छान वाटलं..
सर्फ़िंग करत असताना एक साइट सापडली...बय्राच जणांनी बघितलीही असेल पण मि पहिल्यांदाच पाहिली.

www.shivdharma.com

शिवधर्म!!
ब्राम्हणेतर लोकांचा धर्म...’इतर’ म्हणजे इतर सर्व...
श्री.बाळासाहेब मरळ या धर्माचे/संस्थेचे संचालक आहेत.
या धर्माचे स्वतहाचे संस्कार ,आरत्या आहेत..यातील आरत्या खूप चांगल्या व उत्तम अर्थ असलेल्या आहेत
त्या तुम्हाला साइट्वर पहायला मिळतिलच.

ब्राम्हणांवर या लोकांचा राग इतका का??
तर महराष्ट्र शासना तर्फ़े ’दादोजी कोंडदेव क्रीडा पुरस्कार’ दिला जातो.
तर दादोजी कोंडदेव हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू नव्हतेच अस त्यांचं म्हंटणं आहे..
ते महाराजांचे गुरू होते याचे पूरावे नाहीत असही ते म्हणतात.
समर्थ रामदास स्वामींबद्दलही त्यांचे हेच मत आहे.
संभाजी महाराजांनाही ’ब्रांम्हणानीच’ मारले असंही त्याचं मत आहे..

काय करणार ??काय वेळ आली आहे महाराष्ट्रात??
भारत चंद्रावर पोहोचला तरी आपण मी ब्रांम्हण तू मराठा अशा जाती भेदात अडकून पडणार आहोत का?
बेकारी , गरीबी , अशिक्षितता , अस्वच्छता अशा अनेक महत्वाच्या समस्या महराष्ट्रापूढे असताना असं भांडत बसून कसं चालेल?? आणि त्यातून काय सिद्ध होणार आहे??

दादोजी कोंडदेव , समर्थ रामदास छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू नसल्यास त्यांचे इतिहासातील महत्व कमी होत नाही...की त्यांची महानताही कमी होत नाही..
म्हणून त्यावरून आत्ता भांडत बसण्यात काय तठ्या आहे??

राजकारण्यांच्या अशा राजकारणात आपल्या सारखा सामान्य माणूस असा अडकायला लागला तर देशाच्या आणि महाराष्ट्रच्या प्रगती कडे कोणि पहायचं??
भारतातील सर्व जनता भारत एक महासता बनण्याची स्वप्न पहात असताना अशी फूट पाडण्याचा प्रयत्न करणे म्हणजे भारताला १० पाउले मागे घेउन जाण्यासारखे आहे..

महासत्ता बनण्यासाठी सर्वांनी मिळून, भेदभाव विसरून एक मेका साह्य करू आवघे धरू सुपंथ म्हणायचे की आपापसात भांडत बसून बाहेरच्या शत्रूंना अजून संधी द्यायच्या??

छत्रपती शिवाजी महाराज , बाबासाहेब आंबेडकर , महात्मा फुले या सारख्या महान लोकांनी सुशोभित असणाय्रा महराष्ट्राला हे अभिप्रेत आहे का?

Read more...

माझा छंद

>> Wednesday, November 5, 2008

शिर्शक वाचल्या नंतर तुम्हाला प्राथमिक शाळेत लिहिलेल्या निबंधाची आठवण आली असेल...
सर्वांनाच लहानपणापासून काही ना काही छंद असतो ,
मलाही होता आणि आहे.
काड्यापेट्यांचे box म्हणजे "छाप" जमा करण्याचा...
गेली १०-११ वर्ष मी या क काड्यापेट्या जमा करत आहे आणि आता माझ्याकडे १००० पेक्षाही जास्त काड्यापेट्या आहेत...
निरनीराळ्या shape,size ,colours , designs.. आणि इतर..
आणि प्रत्येक काडेपेटी सोबत तिची छोटी आठवण पण आहे..ती कुठे मिळाली ,कशी मिळाली ,कोणी आणून दिली...
आधी आमच्या गल्ली मधल्या सर्व लहान मंडळींना हा छंद होता..मग त्यामध्ये treading , exchange चालायचं..
पण नंतर मी एकटाच जमा करत राहीलो...
आता माझे बाबा , मित्र मंडळी बाहेर गावी गेले आणि त्यांना एखादा छाप सापडला तर ते माझ्यासाठी आणतात..

तर..
त्यापैकी काही छापांचे फोटोज मी माझ्या फोटो ब्लोग वर टाकले आहेत..

Omkars Photo Blog

पहा आणि प्रतीक्रीया जरूर कळवा..

Read more...

नमस्कार मित्रहो...

नमस्कार मित्रहो...
आज बय्राच दिवसांनी ब्लोग वर पोस्ट लिहितोय..
परीक्षा आणि दिवाळी मुळे वेळ झालाच नाही..असो...
तर सर्व प्रथम दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा !! belated!!

आणि आपल्या भीमांणांचं हार्दिक अभिनंदन!!
भारत रत्न जे की त्यांना आधिच मिळायला हवं होतं ते मिळालं..
पंडीत भीमसेन जोशींचे आता भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी झाले..खुप छान वाटलं..
माझे बाबा त्यांचे फार मोठे Fan आहेत आणि मी पण..

आता माझं ब्लोग लिखाण परत चालू करणार आहे...
तर भेटूच पून्हा..
अच्छा...

Read more...

सचिन म्हणजे काय?

>> Monday, November 3, 2008

Read more...

किल्ले स्पर्धा - प्रथम परीतोषिक व सर्वोत्कृष्ट किल्ला

>> Friday, October 24, 2008

नमस्कार मित्रहो...

पुण्याच्या संभाजी बागेमध्ये दरवर्षी किल्ले स्पर्धा भरविण्यात येतात.
यंदा मि व माझ्या मित्रांनी पहिल्यांदाच स्पर्धेत भाग घेतला.
आम्ही विजयदुर्ग तयार केला आहे.किल्ला खूप छान झाला आहे.
प्रसिद्ध इतिहास प्रेमी निनाद बेडेकर यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.
आजच बक्षिस समारंभ पार पडला.

आम्हाला खूल्या गटात प्रथम परीतोषिक व सर्वोत्कृष्ट किल्ला अशी दोन बक्षिसं मिळाली.

किल्ले विजयदुर्ग




पुण्याचे विभागीय आयुक्त नितीन करीर यांच्याहस्ते बक्षिस घेताना..
सलील,मी,मागे मोनिष , इन्द्रजीत,ह्रुत्विक..
आणि आमचे इतर गडी म्हणजे ह्रिषिकेश , मानस , शिवकुमार फोटो दिसत नाइयेत..





तर आमचा किला बघायला तुम्ही नक्की या..सस्नेह निमंत्रण...

उद्या सकाळी ७ ला किंवा १२ ला E-TV Marathi वर आमची छोटी मुलाखत दाखविणार आहेत..बघायला विसरू नका..

Read more...

सूटले..

>> Wednesday, October 22, 2008


आणि जे सगळ्यांना माहीत होतं तेच झालं...
राज ठाकरे सुटले..हिन्दी न्यूज चानेल वाल्यांचे चेहरे बघण्यासारखे झाले होते.



आज आपले चंद्रयान पण चंद्रास भेटण्यास सुरक्षित रवाना झाले..
म्हणजे आज एकुणच दिवस चांगला गेला.. :)

मनसे च्या कार्यकर्त्यांच्या मारहाणीत जीव गमवाव्या लगणाय्रा पवन ला आदरपूर्वक श्रद्धांजली.
गेल्या पोस्ट वर मला काही तिखट प्रतिक्रिया मिळाल्या आहेत त्या नक्की वाचा..

Read more...

अटक झाली...

>> Monday, October 20, 2008

सकाळी उठल्या उठल्या माझा लहान भाऊ पळत वरती आला आणि म्हणाला "राज ठाकरेंना अटक झाली आणि औंध मध्ये एक बस फोडली"
मी म्हंटल आता झाल ,या वेळीपण आपल्याच पैश्यातल्या बसेस जाळल्या जाणार..
मग टीव्ही लावला..तर न्यूज चानेल वाले कोकलत होतेच.."राज शिकंजे मे"!!!
शिकंजे मे म्हणजे काय? ते हो म्हणाले असतील म्हणून पोलिसांनी पकडलं..नाहीतर पोलिस पण काय मराठीच..हेहे..
पुण्यात तरी सध्या स्थिती शांत आहे..काही तुरळक घटना घडल्या पण तसं शांतच ..
मला माझ्या लहानपणीची घटना आठवली...बाळ ठाकरेंना अटक झाली या नुसत्या अफवेनी आमची शाळा सोडून दिली होती..त्यावेळी बाळ ठाकरे कोण हेपण नीटसं माहीत नव्हतं...सगळे घरी येउन खेळत बसलो होतो.पण खूप मजा आली होती.असो..कोणचं काय आणि कोणचं काय ..
मुंबई पण सध्या शांतच आहे..खूप चांगली गोष्ट आहे..निदान सरकारी मालमत्तेच नूकसान तरी कोणी करत नाइये..
बघू आत पुढे काय होतय ते..
इतर जिल्ह्य्यातले कोणी वाचक असतील तर त्यांनी तिकडे काय चालू आहे ते जरूर कळवावे..

Read more...

Stumble Upon म्हणजे काय रे भाऊ?


गेल्या काही महीन्यांपासून Stumble Upon वर माझे प्रयोग चालू आहेत आणि मला खूप चांगले अनुभव मिळले आहेत. कोणत्याही चांगल्या ब्लोग वर अथवा वेबसाइट वर भरपूर वाचक मिळविण्यासाठी Stumble upon हा सोपा आणि महत्वाचा मार्ग आहे.

मराठी ब्लोग्स व वेबसाइट्स यांनकडे मोठ्या प्रमाणात वाचक वळविण्याची ताकद Stumble Upon कडे आहे म्हणून मी हे छोटेखानी Stumble Upon Guide लिहित आहे.

तर मग चला , Stumble Upon ची ऒळख करून घेवूया..

Stumble Upon म्हणजे काय रे भाऊ?

Internet ला अनूभवण्यासाठी असलेली social website म्हणजे
Stumble upon.. Google सारख्या सर्च ईंजीन वर शोधत बसण्यापेक्षा
Stumble Upon वर आपण आपल्या आवडत्या (Interest) विषयानूसार साइट्स किंवा ब्लोग्स सर्च करू शकतो आणि तेही फक्त एक बटण दाबून..

Stumble Upon Toolbar वरील stumble बटण दाबल्यानंतर
randomly आपण आधी दिलेल्या Interest प्रमाणे कोणत्याही साइट वर अथवा ब्लोग वर जाऊन पोहोचतो. हे Interest चे विषय आपण कधीही बदलू शकतो आणि या पद्धतीने आपल्याला त्या विषयातील अनेक साइट्स पहाता येतात.जर आपल्याला एखाद ब्लोग अथवा वेबसाइट आवडली तर आपण टूलबार वरील Thumps up Or Thumps Down करून आपली पसंती अथवा नापसंती कळवू शकतो.

Stumble upon चा वापर आपण social bookmarking म्हणूनही करू शकतो.
आपल्याला आवडलेला लेख अथवा कवीता आपण Stumble Upon मार्फत मित्रांना पाठवू शकतो.

Stumble Upon ला सुरुवात कुठून करायची?
सुरुवात करताना प्रथम Stumble Upon साइट वरील Stumble Upon Toolbar Download करा व Stumble Upon Toolbar install करून घ्या.
यानंतर या पेज वर जाउन आपली वेबसाइट अथवा ब्लोग Stumble Upon वर आहे का ते पहा.


जर आपली वेबसाइट अथवा ब्लोग यामध्ये नसेल तर आत्ता नवीनच install केलेल्या टूलबार वरील I like it हे बटण दाबा. ह्या नंतर एक छोटी Pop-Up Window open होइल, त्यामधे तूमच्या ब्लोग चे छोटे Description लिहा व तुमच्या ब्लोग ची Category choose करा. आता तुमचा ब्लोग Stuble Upon Detabase मध्ये जमा होइल व जेव्हा एखादी व्यक्ती त्या category मध्ये सर्च करेल तेव्हा तो तुमच्या ब्लोग वर येइल.



मी Stumble Upon का वापरू?
Stumble Upon त्याच्या प्रचंड प्रमाणत वाचक देण्याच्या कुवतीमुळे प्रसिद्ध आहे. जर तुमच्या ब्लोग वर उत्तम आणि Original लिखाण असेल तर Stumble Upon वरून तूम्हाला हजारोंच्या संख्येनी वाचक भेटतील आणि तेही तूमच्या विषयात Interested असलेले.

जेव्हा तुमची साइट Stuble होते , त्यानंतर लगेचच तुम्हाला जगभरातून वाचक मिळू लागतात. पण त्यासाठी तूमच्या ब्लोग वरील लिखाणामध्येही तितकाच दम असणे आवश्यक असते..

ह्यामुळे..
१.तुमच्या ब्लोग ला मोठ्या प्रमाणावर Exposure मिळते.
२.मोठा वाचक वर्ग जमा होतो.
३.आणि त्यामूळे जास्तीत जास्त वाचक आपल्या ब्लोग वर येतात आणि ही संख्या वाढत जाते.



तर मग मित्रहो आज इतकच...

या Stumble Upon ची सुरूवात तुम्ही माझ्या ब्लोग ला Thumps Up करून केलत मला खूपच आनंद होइल..

काही प्रश्ण किंवा शंका असतील तर जरूर विचारा.

धन्यवाद...

Read more...

आयुष्य - छान कवीता

>> Sunday, October 19, 2008

मेल मधून ही कवीता मिळाली...
आवडली, छान आहे...
तुम्हीही वाचावी म्हणून पोस्ट करत आहे..
लेखकाचं नाव खाली नमूद केलं नव्हतं..

एकदा लग्न झालं की, आपलं आयुष्य सुखात जाईल असं आपल्याला वाटत असतं...

असा वाटण्याची जागा मग,

मूल झालं की...

मोठं घर झालं की...

अशा अनेक इच्छांच्या अंगाने वाढतच जाते.

दरम्यानच्या काळात, आपली मुलं अद्याप मोठी झालेली नाहीत. ती जरा मोठी झाली

की सारं ठीक होईल, अशी आपण मनाची समजूत घालू लागतो.



मुलांच्या वाढत्या वयात, त्यांच्या भवितव्याच्या सुंदर स्वप्नांनी आपण आपले दिवस सजवत

असतो. मुलं जरा करती सवरती झाली की सारं कसं आनंदानं भरून जाईल, असं आपल्याला

वाटत असतं.



आपला नवरा / बायको जरा नीट वागायला लागला लागली की...

आपल्या दाराशी एक गाडी आली की...

आपल्याला मनाजोगी सुटी मिळाली की...

निवृत्त झालो की...

आपलं आयुष्य कसं सुखानं भरून जाईल, असं आपण सतत स्वतःशीच घोकत असतो.



खरं असंय, की आनंदात असण्यासाठी, सुखात असण्यासाठी आत्ताच्या वेळेपेक्षा दुसरी योग्य

वेळ कोणतीही नाही.

आयुष्यात आव्हानं तर असणार आहेतच. ती स्विकारायची आणि ती झेलता झेलताच आनंदी

राहायचा निश्‍चय करायचा हेच बरं नाही का?



जगायला - खरोखरीच्या जगण्याला - अद्याप सुरुवात व्हायचीये, असंच बराच काळ वाटत

राहतं.

पण, मध्ये बरेच अडथळे असतात. काही आश्‍वासनं पाळायची असतात, कोणाला वेळ द्यायचा

असतो, काही ऋण फेडायचं असतं....

आणि अगदी शेवटी कळतं, की ते अडथळे म्हणजेच जीवन होतं.



या दृष्टिकोनातून पाहिलं की कळतं,

आनंदाकडे जाणारा कोणताही मार्ग नाही.

आनंद हाच एक महामार्ग आहे.

म्हणून प्रत्येक क्षण साजरा करा.



शाळा सुटण्यासाठी... शाळेत पुन्हा जाण्यासाठी... वजन चार किलोने कमी

होण्यासाठी... वजन थोडं वाढण्यासाठी... कामाला सुरुवात होण्यासाठी... एकदाचं

लग्न होऊन जाऊदे म्हणून... शुक्रवार संध्याकाळसाठी... रविवार सकाळसाठी...

नव्याकोऱ्या गाडीची वाट बघण्यासाठी... पावसासाठी... थंडीसाठी... सुखद

उन्हासाठी... महिन्याच्या पहिल्या तारखेसाठी... आपण थांबून राहिलेले असतो.

एकदाचा तो टप्पा पार पडला की, सारं काही मनासारखं होईल, अशी आपणच आपली

समजूत घातलेली असते. पण, असं काही ठरवण्यापूर्वी आनंदी होण्याचं ठरवा.





आता एक गोष्ट.

काही वर्षांपूर्वीची. सिएटलच्या ऑलिम्पिकमध्ये शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत

सहभागी झालेले नऊस्पर्धक स्पर्धा सुरू होण्याच्या संकेताची वाट पाहात जय्यत तयार उभे

होते. ही सारी मुलं शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या अपंग होती.



पिस्तुलाचा आवाज झाला आणि शर्यत सुरू झाली. साऱ्यांनाच पळता येत होतं असं नाही.

पण, प्रत्येकाला स्पर्धेत भाग घ्यायचा होता आणि महत्त्वाचं म्हणजे जिंकायचं होतं.



धावता धावता एकाचा तोल गेला. काही गोलांट्याखाऊन तो पडला आणि रडू लागला.

त्याच्या रडण्याचा आवाज ऐकून अन्य आठही जण पळायचे थांबले.

सारे मागे फिरले... सारे जण...



'डाउन्स सिन्ड्रोम'ची व्याधी असलेली एक मुलगी त्याच्या जवळ बसली. तिने त्याला

मिठी मारली आणि मग विचारलं, ''आता बरं वाटतंय?''

मग साऱ्यांनी त्याला उभं केलं आणि अंतिम रेषेपर्यंत सारे खांद्याला खांदा लावून चालत

गेले.



ते दृष्य पाहून मैदानावर उपस्थित असलेले सारेजण हेलावून गेले. उभे राहून मानवंदना देत

साऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. बराच काळ त्या टाळ्यांचा आवाज आसमंतात गुंजत

होता...

त्यावेळी तिथे उपस्थित असलेली मंडळी अजूनही त्या घटनेची आठवण काढतात.

का?

कुठेतरी आत खोलवर आपल्याला प्रत्येकाला ठाऊक असतं की आयुष्यातली सर्वांत महत्त्वाची

गोष्ट असते ती स्वतःसाठी जिंकण्यापेक्षा कितीतरी मोठी असते.



आयुष्यातली सर्वांत महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे इतरांना जिंकायला मदत करणं.

त्यासाठी वेळप्रसंगी आपला वेग कमी करावा लागतो किंवा अगदी शर्यतच बदलावी लागते

.



शक्‍य तितक्‍या लोकांना हे सांगा. त्यानं आपलं हृदयपरिवर्तन घडून येईल. कदाचित

इतरांचंही...



दुसरी मेणबत्ती लावण्यासाठी वापरल्याने पहिल्या मेणबत्तीचं काहीच कमी होत नाही.

नाही का?

Read more...

3rd Commonwealth Youth Games Pune Report -उत्तरार्ध

>> Tuesday, October 14, 2008

नमस्कार मित्रहो..CYG च्या report चा उत्तरार्ध पोस्ट करीत आहे.
उशीर झाल्याबद्दल माफ़ी असावी...

७१ देश represent करण्यासाठी ७१ शाळा participate झाल्या आहेत,अस कळलं. नक्की त्या काय करणार आहेत हे अजून माहीत नाही. सराव फक्त पाहीला. पण तो पाहील्यावरही accuracy , professionalism जाणवलं नाही.पण आपली लहान मुलं मात्र October च्या भर उन्हात सराव करत होती. तेही सकाळी ११ पासून ४ वाजे पर्यंत..!! Opening ceremony तरी चांगली होइल अशी आशा करूया..

परतीच्या वाटेवर खूप शाळांतील मुलं Baton Relay च्या स्वागता साठी थांबली होती.
शहरातला प्रत्येक माणूस सहभागी व्हावा हेच या मागचं उद्धिष्ट असावं.

Volunteer म्हणून CYG मध्ये यायची प्रत्येकाची कारणं वेगळी आहेत.काही जणं मदत करायला आवडतं म्हणून ,काही जणं uniform चा show-off करण्यासाठी ,काही जणं certificate साठी. मला पण बय्राच जणांनी विचारल काय गरज आहे जायची? माझं उत्तर असं आहे की ,एकतर आपल्या शहरात CYG होत आहे,
volunteer ship साठी profession , education , age m इ. कशाचीही अट नाइये, मग या देशाची नागरीक ,शहरवासी म्हणून खारीचा वाटा उचलायला काय हरकत आहे?

असो, पहीला दिवस असा पार पडला .आज मांडलेली मतं कदाचीत बदलतीलही..आणि रोज काय घडलं हे सांगायला मी पोस्ट लिहीनच.

तर भेटू उद्याच..bye bye..आणि वेळ देऊन वाचल्याबद्दल धन्यवाद..तुमच्या प्रतिक्रिया मला अजून लिहायला प्रोत्साहन देतात..तर प्रतिक्रीया द्यायला विसरू नका..

पहील्या दिवसाचे काही फोटो मी ब्लोग मध्ये पोस्ट केले आहेत.

Read more...

3rd Commonwealth Youth Games Pune Report - पूर्वार्ध

>> Saturday, October 11, 2008

नमस्कार मित्रहो,
आमच्या सारथीच्या लेखक वर्गात आणखी एका लेखीकेची भर पडली आहे. ऋतुजा कशाळकर त्यांचे नाव.
तर ऋतुजा ताईंचा पहील्या लेखाचा पूर्वार्ध आपल्यासाठी पोस्ट करीत आहे..उत्तरार्ध २,३ दिवसात प्रकाशीत होइल..

पूर्वार्ध
blog साठी छान काहितरी लिहायच होत.पण विषयच सापडत नव्हता.आज तो मिळाला.
मी Commonwealth Youth Games साठी Volunteer आहे.दोन महीने आधीच registration झाल.मग interview झाला,selection झालं आणि मग step by step training झाली. एवढं सगळं होत असताना actual games च्या वेळी काय आणि कसं असेल याची उत्सुकता खुप होती. आपण घेतलेल training कधी आणि कसं वापरू शकू आपण, याचा सतत विचार चालू असायचा..

आज volunteer म्हणून काम करायचा पहिला दिवस .दसय्राच्या मुहूर्तावर चालू झाल हे चांगल झालं असं उगीच वाटलं.दिलेला uniform घालून छत्रपती श्री शिवजी महाराज क्रीडनगरीत गेले.बसच schedule पण आर्धेच कळलेल.बस कुठेपर्यंत जाणार, stadium मध्ये कुठुन कस जायच,PMT bus volunteer साठी फ़्री आहे हे खरचं आहे का?,असे नानाविध प्रश्न येत होते.बस मिळली .बालेवडीत शिरताना खुप सारे boards दिसू लागले.मुख्य प्रवेश द्वारातून आत आल्यावर वातावरण बदललेल जाणवलं..

आत जाताना checking झालं , डोळ्यांना खूप काही दिसत होत.वेगवेगळी माणसं ,भरपूर काम,गाड्या ,पोलीस , शाळेतली मुलं , माझ्यासारखेच volunteers आणि शिवाजी महाराजांचा पुतळा .हे पहात असतानाच माझी team कुठे आहे ,कामचं ठिकाण, काम , जागा इ. डोक्यात चालूच होत.शेवटी team members and leader भेटले..कामाच स्वरूप समजलं .पण नुसतच समजून उपयोग नाही तर ते करणं पण जरूरी आहे. system ,process ची घडी रूळली नसल्यामुळे बारीक सारीक त्रुटी दिसत होत्या आणि जाणवतही होत्या.

तास-दीड तास झाल्यावर आजच काम झालय अस कळल.तोपर्यंत team members चे चेहरे ओळखीचे झाले होते.निरोप घेउन प्रत्येक जण निघाले.

आल्याबरोबर लगेच काय जायचं आणि इकडे तिकडे फिरू या दोन करणांमुळे मी मात्र तिथेच घुटमळत राहीले. Athletics stadium मधला मुलांचा सराव पाहीला.मग मी निघाले.फिरत असताना दाखल झालेले संघ दिसले.आपल्या देशात खेळण्यासाठी आलेल्या परदेशी पाहूण्यांना पाहून छान वाटत होत. आपण host आहोत याबद्दल नक्कीच अभिमान आणि त्यात महाराष्ट्रात म्हणून जास्तच!!

सगळ नाही पण बरच काही डोळ्यात साठवून घरी निघाले. CYG ने प्रशिक्षण नीत व्हावं ,योग्य तो message ,content पोहोचावा ,सगळ्या volunteers ना एका common base ला आणावं यासाठी खूप आणि चांगले प्रयत्न केले. प्रशिक्षण घेताना खूप भारी वाटायच.

पण आज एकूण परीस्थिती पहाता प्रशिक्षण आण implementation यात अंतर असल्याच जाणवलं..बराचसा गोंधळ होता. Volunteers स्वतहाच काम ,टीम , हेड, कामच ठीकाण याबद्दल साशंकता होती.हे झाल माझं मत.पण नंतर बय्राच जणांशी बोलणं झाल तेव्हाही सर्वांचा हाच सूर होता.

तिथल्या कामाबदल सांगायच झाल तर ७०%-८० % कामं पूर्ण झाली आहेत.पण छोट्या छोट्या खूप गोष्टी अजून बाकी आहेत.झाडं लावणं , साफ़सफ़ाइ , सुशोभीकरण खूप बाकी आहे.जे की आत्तापर्यंत पूर्ण होणं आपेक्षित होत.आत उरलेल्या वेळात ही काम होतील अशी अपेक्षा करू. तरीपण final touch देणं राहून जाइलच.

पुण्यातील शरद पवार , अजित दादा यासारख्या आणि अनेक मूर्ख आणि स्वार्थी राजकारण्यांच्या मुळे या कामांना विलंब झालाय नाहीतर सर्वकाही आधीच पुर्ण झालं असतं.हे काम पुण्यासाठी नाही तर भारतासाठी करत आहोत हे गोष्ट यांच्या लक्षातच येत नाहीत.या बद्दल वर्तमानपत्रात लेख रोज येत आहेतच.

Read more...

२ ओक्टोबर

>> Wednesday, October 1, 2008

नमस्कार मित्रहो...
आज २ ओक्टोबर...
वाढदिवस गांधीजींचा,
आणि माझापण...
सध्यस्थितिला माझ्या या ब्लोगची परिस्थिति फ़ार काही चांगली नाही..
४ च पोस्ट मे ’पोस्ट’ केले आहेत..
वाचक संख्या जवळ जवळ ० आहे..
अजुन खुप काम बाकी आहे..खुप काम करायचं आहे..
बघू...आजचा दिवस तर माझाच आहे..:)
लवकरच ही परिस्थिती बदलेल...आणि मी ती बदलीन..

Read more...

BLOG - पैसे कमावण्याचे साधन.

>> Saturday, September 27, 2008

ब्लोग मधून आपण पैसे कमवू शकतो का हो??
...शकतो ना..का नाही??आणि ते ही भरपूर..

इंटरनेट वरून अथवा ब्लोग मधून पैसे कमावण्याचे उत्तम साधन म्हणजे "जाहिरात".
कसे??
तर, इंटरनेट वर अनेक अशा साइट्स आहेत ज्या जाहिरती पूरवितात.आपण अशा साइट्स ना आपल्या ब्लोग वर जाहीरात करण्यासाठी जागा द्यायची.मग साइट्स आपल्या ब्लोग वर जाहिरात करतात ,जेव्हा आपला एखादा वाचक ही जाहिरात वाचून त्यावर क्लिक करतो तेव्हा त्या जाहिराती साठी आपल्याला भाडे दिले जाते.

ही पद्धत खुप उत्तम आहे आणि या मार्गे एखादा उत्तम ब्लोगर पुरेसे पैसे कमावू शकतो.

पुरेसे म्हणजे किती रे भाऊ??
असा प्रष्ण मनात नक्की आला असेल..तर याचे उत्तर म्हणजे ५००० ते २०००० / महीना. सुरवातीला पुरेसे नाहीत का? लाखो रूपये कमावणारे देखील लाखो लोक आहेत! पण ते पुढे..
कोणीही कधीही फुकट काही देत नाही ,म्हणजेच त्यासाठी आपल्यला थोडे तरी कष्ट घ्यावे लागतीलच ना?

असो,
कष्ट म्हणजे काय करायच ते मी तुम्हाला नंतर सांगीनच..आधी अकाऊंट तर ओपन करू...
जाहीराती पूरवीणाय्रा अनेक साइट्स आहेत..
उदा:









Google ad sense



या पैकी Google ad sense ही बहुतेक लोक वापरतात. AdBrite ही सुद्धा साइट उत्तम आहे.

BidVertiser ही सुद्धा वेगळ्या प्रकारच्या जहिराती पुरविणारी साइट आहे.

एक महत्वाची गोष्ट म्हणजे Google ad sense द्वारा कमाई करणारे सर्वात जास्त लोक भारतात आहेत!!!

चला तर मग सुरु करूया ब्लोग मधून पैसे कमवायला..

Google ad sense or AdBrite मध्ये account open करा.
पुढे काय करायच ते सांगायला मी आहेच!

तुमचा इ-मेल वरती Register करायला विसरू नका...

Read more...

ब्लोग टेम्प्लेट कसे असावे?

>> Thursday, September 25, 2008

माणसांचा जसा समाज असतो तसाच ब्लोग्स चा देखिल समाज आहे त्यास ब्लोगोस्फीअर असे म्हणतात.माणसे आली म्हणजे त्यांचे स्वभाव आले,चालिरीती ,पेहराव आले.त्याचप्रमाणे ब्लोग चा पेहराव म्हणजे "टेम्प्लेट".

या टेम्प्लेट वरुनच ब्लोगोस्फीअर मध्ये ब्लोग लिहिणार्यचे ब्लोग विश्वातील स्थान , विचार ओळखले जातात.

म्हणुनच टेम्प्लेट निवडताना ते आपल्या विषयाला सुसंगत असेल, रंगसंगती चांगली असेल व येणाय्रा वाचकला ब्लोग वचावेसे वाटेल असेच असावे. ब्लोगचा एकुनच केंद्रबिंन्दु ’वचक’ हा असल्यामुळे त्यास जे योग्य वाटेल ते लेखकाने करावे.
वाचक आपल्या ब्लोग वर फ़िरत फ़िरत अचानक येतात.आपले वेबपेज त्याच्यासमोर डाउनलोड होत असतना वाचक भंजाळून जाउ नये याची खबरदारी आपणच घेतलि पाहिजे.
म्हणुनच टेम्प्लेट निवडताना साध , स्वच्छ ,सोप टेम्प्लेट निवडलेल चांगल.

आत थोड टेम्प्लेट विषयी,
टेम्प्लेट साधरणत: २ कोलम , ३ कोलम , ४ कोलम चे असतात.
२ कोलम चे टेम्प्लेट डीफ़ोल्ट मिळते.यामध्ये एक कोलम पोस्ट साठी तर दूसरा कोलम इतर माहितीसाठी असतो.३ कोलम मध्ये पोस्ट ची जागा कमी करून अजून १ कोलम जोडलेला असतो.
जनरली , ब्लोगर्स ३ कोलम चे टेम्प्लेट निवडतात .ते सोयीचेही पडते आणि दिसायलाही चांगले वाटते.

टेक्स्ट उठून दिसेल याचि काळजी घ्यावी.वाचकाल डोळे फाडून फाडून वाचायला लागु नये म्हणजे झाल.इतर दोन्ही कोलम्स मध्ये जास्त खिचडी करू नये.

आपल ब्लोग पहाणाय्राला छान वाटला पाहिजे व त्याने तो वाचल पाहिजे.

आजून पुढच्या टिप्स मी पोस्ट मध्ये देत राहिनच.

खालील साइट्स वर तूम्हाला चांगले ब्लोग टेम्प्लेट्स मिळू शकतात..

bloggertricks
www.jackbook.com
www.blogcrowds.com

तुमचा इ-मेल वरती रजिस्टर करायला विसरू नका.

Read more...

हा ब्लोग का??

>> Wednesday, September 24, 2008

प्रत्येक क्रुतीला एक कारण असते,हे कारण असते म्हणुनच ती क्रुती होते आणि कारण जर तितकेच मजबूत असेल तर क्रुतीही तितकिच चांगली होते आणि त्याला सर्वांची दादही मिळते.
तर,
मित्र,मैत्रिणि,काका,काकु,आजी,आजोबा,चिंट्या,पिंट्या..सर्वांना जे कोणी ब्लोग लिहितात त्यांच्यासाठी हा पोस्ट..

मला ब्लोगिंग करत आत २ वर्ष होत आली.तशी फार नाहीत पण या २ वर्षात अनेक ब्लोग्स बघितले, वाचले , ईंग्रजी,मराठी , हिंदी ,खुप सार्या विषयांवरचे , चांगले आणि वाइटही...

आत आपण वळूया आपल्या माय मराठी ब्लोगिंगकडे..
हल्ली , सर्वांच्या कानवर ’ब्लोग’ हा शब्द बर्याचदा पडत असेल.आमिर खान चा असेल , अमिताभ चा असेल नाहीतर अजुन कोणाचा..बर,पुढे , कुतूहलने ,माहिती घेउन ब्लोग चालूही केला असेल...
मग??
पुढे काय??
आरे वाचणार कोण??

तर पुढे काय करायचे ते मी सांगतो..

खूप सारे मराठी ब्लोग्स वाचनात आले.कोणाच्या कविता,लेख,अमेरिकेतल्या आजींचे अनुभव ...बरचं कही..
वाचून खुप छान वाटायच..पण मी एकट्याने वाचुन काय होणार??
इतकं दर्जेदार लेखन जस्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे..

तर,
जे नविन ब्लोगेर्स आहेत, पण उत्तम लेखक आहेत त्यांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसे पोहोचावे हे सांगण्यासाठी हा माझा मराठी ब्लोग ’ सारथी’

या नंतरचे ’पोस्ट’ मी लवकरच पोस्ट करीन....

मग भेटूच...

Read more...

सारथी

>> Tuesday, September 23, 2008

नमस्कार मित्रहो ,
सारथी या मराठी ब्लोग वर आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे.
या ब्लोग वरील ही पहिली नोंद आहे.
पुढील नोंदी मी लवकरच पोस्ट करीन.

Read more...
Related Posts with Thumbnails

Total Pageviews

Follow me on Blogarama
Netbhet.com  मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!
marathisuchi - free marathi link sharing website & marathi blogs aggregator
Blogvani.com
eXTReMe Tracker

  © Blogger template Inspiration by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP